आरोग्य
कोपरगावात पुन्हा विक्रमी सोळा कोरोना रुग्णांची वाढ
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात पुन्हा कोरोना विषाणूच्या साथीने डोके वर काढले असून आज ५८ संशयित नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या त्यात तब्बल १५ जण कोरोना बाधित निघाले असल्याची माहिती ग्रामीण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.या शिवाय कोपरगाव शहरात विक्रमी रुग्ण संख्या आढळून आली असून स्वामी समर्थनगर येथील १० रुग्ण आढळले आहे त्यात सहा पुरुष (वय वर्ष-८,३७,४५,३३,७९ वर्षांचा समावेश) तर चार महिलांचा त्यात (वय वर्ष- १७,३६,४०,३०) समावेश आहे.तर शिंदे-शिंगी नगर येथील एक १४ वर्षीय मुलगी बाधित आढळली आहे.त्या खालोखाल सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत काल आढळलेल्या रुग्णाच्या घरातील तीन रुग्ण आढळले आहे (त्यात एक पुरुष वय-४५ वर्ष,एक ६० वर्षीय महिला,व एक २० वर्षीय महिला यांचा समावेश आहे) या खेरीज कोपरगाव बेट येथील एक वीस वर्षीय तरुण व डाऊच खुर्द येथे एक कोरोना बाधित आढळला आहे.आज १६ रुग्ण वाढल्याची हि पहिलीच वेळ आहे.त्यामुळे नागरिकांत या साथीची भीती वाढली आहे.
राहाता तालुक्यातील शिर्डीत कोविड-१९ च्या रुग्णांनी पन्नाशी कधिच ओलांडली आहे.राहाता,वैजापूर,येवला,औरंगाबाद नाशिक,संगमनेर,मालेगाव आदी ठिकाणी कहर उडाला आहे.कोपरगाव तालुक्यात कोपरंगवसह सुरेगावात उच्चांक झालेला आहे.अशा परिस्थिती नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे अपेक्षित आहे.मात्र त्या पातळीवर नागरिकांत शुकशुकाट दिसत असल्याने काळजी वाढली आहे.
कोपरगाव शहरात काल सायंकाळी पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची मोठी वाढ झाली होऊन नव्याने आठ रुणांची त्यात भर पडली होती.त्यात वाढलेल्या रुग्णांत लक्ष्मीनगर येथील एक ५० वर्षीय पुरुष,व एक ४५ वर्षीय पुरुष असे दोघे तर सुरेगाव येथील २७ वर्षीय पुरुष,शिंदे-शिंगीनगर येथील ४९ वर्षीय पुरुष,व एक ३६ वर्षीय महिला,या खेरीज स्वामी समर्थनगर येथील ५४ वर्षीय महिला व २१ वर्षीय पुरुष व एक ६६ वर्षीय महिला आदी ८ नागरिकांचा समावेश होता आता आज १६ रुग्णांची भर पडल्याने दोन दिवसात चोवीस रुग्णांची भर पडली आहे.
राहाता तालुक्यातील शिर्डीत कोविड-१९ च्या रुग्णांनी पन्नाशी कधिच ओलांडली आहे.राहाता,वैजापूर,येवला,औरंगाबाद नाशिक,संगमनेर,मालेगाव आदी ठिकाणी कहर उडाला आहे.कोपरगाव तालुक्यात कोपरंगवसह सुरेगावात उच्चांक झालेला आहे.अशा परिस्थिती नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे अपेक्षित आहे.मात्र त्या पातळीवर नागरिकांत शुकशुकाट दिसत असल्याने काळजी वाढली आहे.अद्यापही काही तरुण व नागरिक मुखपट्या बांधण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.आता पोलिसानी कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला आहे.