जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

कोपरगावातील..या देवी तिर्थास’क’ वर्ग मंजुरी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव( प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी द्या,कोकमठाण येथील श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्रास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात यावा,रांजणगाव देशमुख उपसा जलसिंचन योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प मिळावा आदी मागण्या आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे नुकत्याच केल्या आहेत.

पालकमंत्री ना.मुश्रीफ यांनी श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास या बैठकीत तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करून उर्वरित मागण्यांची देखील लवकरच पूर्तता करण्याची ग्वाही दिली आहे.आ.काळे यांच्या प्रयत्नांतून मागील वर्षी श्री.क्षेत्र मयुरेश्वर’ देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे-आ.आशुतोष काळे.

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.२५ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली आहे.त्यावेळी हे आश्वासन दिले आहे.

या बैठकीसाठी ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले,खा.सुजय विखे,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,विमल आगवण,सोनाली साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीसाठी उपस्थित असलेले आ.काळे यांनी पालकमंत्र्यांकडे मतदार संघाच्या विविध विकास कामांसाठी निधीची मागणी करून मतदार संघातील कोकमठाण येथील श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करावा,सलग दोन वर्ष मोठ्याप्रमाणावर झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून या रस्त्यांसाठी भरीव निधी द्या. तसेच कोपरगाव तालुक्याच्या दुष्काळी गावातील रांजणगाव देशमुखसह,अंजनापूर,बहादराबाद,धोंडेवाडी,सोयेगाव,वेस,मनेगाव अशा सात गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे. या ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे वीजबिल थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली असून वारंवार उद्भवणाऱ्या वीज बिलाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रांजणगाव देशमुख प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाची मागणी केली.या मागण्यांपैकी पालकमंत्री ना.मुश्रीफ यांनी श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास या बैठकीत तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करून उर्वरित मागण्यांची देखील लवकरच पूर्तता करण्याची ग्वाही दिली आहे.आ.काळे यांच्या प्रयत्नांतून मागील वर्षी श्री.क्षेत्र मयुरेश्वर’ देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे.श्री.लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आल्यामुळे या मंदिराकडे जाणारे रस्ते तसेच परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.सदर मागण्यांना पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती आ. काळे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close