जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

श्री साईबाबा संस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


  शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्थेच्या सहकार्याने व अखिल भारतीय ब्राह्मण करिवेना नित्यन्नदान सत्रम,शिर्डी शाखेतर्फे दि. ९ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

  या कार्यक्रमांतर्गत श्री विष्णु सहस्रनाम पारायण, पूर्णाहुती तसेच श्रीनिवास कल्याणम् या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजता द्वारकामाई ते श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपापर्यंत शोभायात्रेने होईल. तर दिनांक ९ आणि १० एप्रिल २०२६ रोजी कोटी विष्णु सहस्रनाम पारायणाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत पारायण होईल. तसेच सायंकाळी ७.३० नंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


  दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सुदर्शन होम व पूर्णाहुती पार पडणार असून दुपारी ४ वाजता डॉ.एम.श्रीनिवासराव यांचे प्रवचन होईल.सायंकाळी ६ वाजता श्रीनिवास कल्याणम् आणि रात्री ९ वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close