पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या तीर्थक्षेत्र विकासासाठी ५० लाख मंजूर!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडून तालुक्यातील ०५ देवस्थानांना ५० लाखाचा निधीसाठी नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“कोपरगाव मतदार संघातील माहेगावसह पाच तीर्थक्षेत्रांचा ५० लाख रुपयांच्या निधीमुळे विकास जलदगतीने होऊन भाविकांना चांगल्या सुविधा साध्य होणार आहे याचा आनंद होत आहे”- आ.आशुतोष काळे.कोपरगाव.
महाराष्ट्र हे एक अद्भुत राज्य आहे जिथे भरपूर समृद्धी,सांस्कृतिक वारसा,निसर्गाचे दैवत,नवीनतम तांत्रिक फायदे आणि आध्यात्मिकदृष्ट्या खास ठिकाणे आहेत! येथे तुम्हाला पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत,महाराष्ट्रात अध्यात्माची भावना आहे जी मन आणि आत्म्याला शांती देऊ शकते.या भूमीची तीर्थयात्रा कधीही व्यर्थ जाणार नाही आणि तुम्हाला हृदयातील आनंद आणि समृद्धी नक्कीच मिळेल कोपरगाव तालुका याला अपवाद नाही.

कोपरगाव मतदार संघातील या पाच तीर्थक्षेत्रांचा विकास जलदगतीने होऊन भाविकांना चांगल्या सुविधा साध्य होणार आहे याचा आनंद होत असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. ५० लाखाच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री राधाकृष्ण विखे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आ.काळे यांनी आभार मानले आहे.
कोपरगाव तालुक्यात विविध गावांना प्राचीन व धार्मिक वारसा मोठा आहे.मात्र अनेक गावे आणि तीर्थक्षेत्रे विकासासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहे.त्यात आ.काळे यांचे स्वतःचे गाव माहेगाव देशमुखचा समावेश आहे.त्यासाठी ते निधीच्या प्रयत्नात होते.त्याला यश आल्याचे दिसत आहे.येथील श्री अमृतेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (२०लाख)रुपये,चांदेकसारे येथील श्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (१०लाख),भोजडे येथील श्री राजा वीरभद्र देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (१०लाख), कोकमठाण येथील श्री लक्ष्मी माता मंदिर देवस्थान या ठिकाणी पथदिवे बसविणे (१०लाख) या देवस्थानांचा समावेश असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिकच्या सोयी सुविधा मिळून त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत.त्यामुळे भाविकांमध्ये आ.काळे यांच्या या कामाबाबत समाधान दिसत आहे.