जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

पाच शिल्पांची…या प्रसिद्ध संस्थानला भेट !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 

    देश-विदेशातील लाखो साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री साईबाबा संस्थानला आज एक अनोखी भेट प्राप्त झाली असून दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील पाच साईभक्त कुटुंबांनी आपली श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करत श्री साईबाबांची वेगवेगळी पाच शिल्प श्री साईबाबा संस्थानला दान दिले आहेत. या शिल्पांचे अनावरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचेसह  संबंधित देणगीदार साईभक्तांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

   श्री ए.वेणुगोपाल व श्रीमती ए.शोभा यांचे दगडावर बसून आशिर्वाद देणारे,विशाखापट्टणम,आंध्रप्रदेश येथील श्री जी.श्रीनिवास व श्रीमती जी.श्रद्धा यांचे फळीवर निद्रावस्थेत असलेले तर सिकंदराबाद,तेलंगाणा येथील प्रकाश चन्नावर व श्रीमती गीता चन्नावर यांचे लोडवर टेकून बसलेले साईबाबांचे शिल्प प्रदान करण्यात आले आहे.

  शिर्डीतील साई भक्तांची भक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.देशविदेशातील भक्तांची गर्दीही वाढत चालली आहे.आपल्या श्रद्धेप्रमाणे ते बाबांना विविध वस्तू अर्पण करत असताना दिसतात.त्यातून बाबांची महती देश विदेशात पसरत चालली आहे.असाच अनुभव नुकताच शिर्डी करांना आला आहे.यातील साई भक्त कोरुतला व्हिलेज,तेलंगणा येथील श्री ए.वेणुगोपाल व श्रीमती ए.शोभा,श्री जी.श्रीनिवास व श्रीमती जी.श्रद्धा,तेलंगाणा येथील श्रीमती ए.माया व श्री ए.बाबूराव आदींनी विविध शिल्पे साई बाबांना अर्पण केली आहेत.

यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले,प्रज्ञा महांडुळे-सिनारे,विश्वनाथ बजाज,कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे,सहाय्यक अभियंता स्वप्निल गायकवाड, मॅकेनिकल विभागप्रमुख अतुल वाघ,श्री साईप्रसाद निवासस्थान विभागप्रमुख प्रविण मिरजकर यासह संस्थानचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


   पाचही शिल्पे कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना असून संस्थानच्या विविध ठिकाणी ही शिल्‍पे बसविण्यात आली आहेत.हैद्राबाद,तेलंगाणा येथील श्री के.मोहन रेड्डी आणि श्रीमती के.श्रीदेवी यांनी दान दिलेले दगडावर बसलेले साईबाबांचे शिल्प व सिकंदराबाद,तेलंगाणा येथील प्रकाश चन्नावर व श्रीमती गीता चन्नावर यांचे लोडवर टेकून बसलेले साईबाबांचे शिल्प नवीन दर्शन रांगेत स्थापन करण्‍यात आले आहे.

    कोरुतला व्हिलेज,तेलंगणा येथील श्री ए.वेणुगोपाल व श्रीमती ए.शोभा यांचे दगडावर बसून आशिर्वाद देणारे साईबाबांचे शिल्प नवीन शैक्षणिक संकुलात ठेवण्यात आले. विशाखापट्टणम,आंध्रप्रदेश येथील श्री जी.श्रीनिवास व श्रीमती जी.श्रद्धा यांचे फळीवर निद्रावस्थेत असलेले साईबाबांचे शिल्प द्वारावती भक्तनिवासात ठेवले गेले.तर,हैद्राबाद, तेलंगाणा येथील श्रीमती ए.माया व श्री ए.बाबूराव यांनी दिलेले द्वारकामाईत बसलेले साईबाबांचे शिल्प श्री साई आश्रम भक्तनिवासात प्रतिष्ठापित झाले.

    या प्रसंगी साईभक्तांचे भावपूर्ण योगदान आणि संस्थान प्रशासनाची नियोजनबद्धता यांचा समन्वय दिसून आला.श्रद्धा व भक्तीचे प्रतीक असलेली ही शिल्पे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवी आध्यात्मिक अनुभूती देतील,असा विश्वास शेवटी व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close