पर्यटन व तीर्थक्षेत्र
साई संस्थानला…या कंपनीकडून इलेक्ट्रीक रिक्षा देणगी

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या सेवेत अधिक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने टी.व्हि.एस.कंपनीच्या वतीने टि.वही.एस.मॅक्स ई.व्हि.ही ३ चाकी इलेक्ट्रीक रिक्षा देणगी स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.संस्थानच्या वतीने वाहनाची विधीवत पूजा करून टि.व्ही.एस. मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एन.राधाकृष्णन यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे वाहनाची चावी सुपुर्द केली आहे.

दरम्यान संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी के.एन.राधाकृष्णन यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला आहे.
या कार्यक्रमाला टि . व्हि.एस.कंपनीचे सेल्स रिजनल मॅनेजर मनप्रित सिंग छाब्रा,सर्व्हिस रिजनल मॅनेजर सौरव घोराई,एरिआ मॅनेजर आशिष जैसवाल तसेच संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे,प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले,विश्वनाथ बजाज,कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे यापूर्वीही टी.व्हि.एस.कंपनीने श्री साईबाबा संस्थानला ११ दुचाकी आणि २ तीन चाकी वाहने देणगी स्वरूपात प्रदान केली आहेत.संस्थानकडून या सहकार्याबद्दल सदर कंपनीचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहे.