कोपरगाव तालुका
कोपरगावात आणखी एका पोलीस अधिकाऱ्यास निरोप देणार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक जिल्हा ग्रामीण मध्ये नुकतीच बदली झाली असून त्यांचा निरोप समारंभ काल सायंकाळी ०८ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला असताना आज सायंकाळी ६.३० वाजता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले कोपरगाव शहर वासीयांना निरोप देत असून त्या साठी त्यांच्या सहकाऱ्यांनी,’निरोप समारंभाचा कार्यक्रम’ आयोजित केला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी जिल्हा बदलून गेले आहे मात्र कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे आपल्या शेजारी पन्नास फूट अंतरावर असलेल्या कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर होत असल्याने त्यांच्या नशिबाचा अनेक सहकाऱ्यांना हेवा वाटत असून ते कसे भारी पडले याची जोरदार चर्चा शहरात रंगत आहे.त्यासाठी संवत्सरच्या शृंगेश्वरास नारळ फोडल्याचे समजले जात असून त्यामुळे लोणी बुद्रुक मधील श्री म्हसोबा त्यांना प्रसन्न झाल्याचे शहरातील नागरिकांत मानले जात आहे.
जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक,सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांचे आदेश नुकतेच जारी झाले आहेत.पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अध्यक्षतेखाली अस्थापना मंडळाच्या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत.संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले असल्याने त्याबाबत कारवाही सुरु झाली आहे.त्यात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव हे नुकतेच नाशिक ग्रामीणला रुजू होण्यासाठी रवाना झाले असून त्यांच्या जागी आता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे रुजु होत आहे.त्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे त्यांचे सहकारी त्यांना आज सायंकाळी भावपूर्ण निरोप देत आहे.त्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होत आहे.त्यासाठी निवडक मान्यवरांना निमंत्रित केले आहे.