जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

कोपरगावात…थोरात याने पटकवला ‘बुद्धिबळ चषक’

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लब आयोजित खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत अथर्व महेश थोरात याने नामांकित खेळाडूंवर मात करत खुल्या गटात एकूण ५ डावामध्ये अजिंक्य राहून कोल्हे चषक पटकाविला आहे.या स्पर्धेत एकूण ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये,पत्राने,आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो कोपरगावात शहरात नुकत्याच या खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.त्यात थोरात याने हे यश प्राप्त केले आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर खेळात या ८x८ च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या-पांढऱ्या रंगाची असतात.पहिला खेळाडू पांढऱ्या तर दुसरा काळ्या सोंगट्यांनी खेळतो.या सोंगट्यांना मोहरे म्हणतात.प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे सोळा मोहरे असतात.याबाबत गणेशोत्सवानिमित्त कोपरगावात स्पर्धा आयोजित केली होती.

या पूर्वी अथर्वने कोपरगाव,संगमनेर,नगर येथील बुद्धीबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आहे.त्याला क्रीडाशिक्षक नितीन सोळके यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.चि.अथर्व याच्या यशस्वी कामगिरीबद्दल संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष कोल्हे,माजी आ.कोल्हे,पराग संधान,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,बाबासाहेब गांगर्डे,स्वच्छतादूत सुशांत घोडके,कोपरगाव चेस क्लबचे अध्यक्ष प्रमोद वाणी,राजेंद्र कोळपकर,नितीन जोरी,यश बंब,संकेत गाडे,राजेंद्र कोहकडे,रमेश येवले,परशुराम साळवे,बापूराव थोरात,लक्ष्मण सताळे,गणेश राक्षे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close