खेळजगत
राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धेत कु. कांचन लंगेचे सुयश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अहमदनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या सतराव्या बालनाटयस्पर्धेत आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित, आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलातील विद्यार्थीनी कु. कांचन दिलीपराव लंगे हिने राज्यस्तरीय ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या बालनाटयात सादर केलेल्या अभिनयात प्रशस्तीपत्रासह उत्कृश्ट अभिनयाचे पारितोशिक प्राप्त करुन गुरुकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
कु. कांचन लंगे बीड जिल्हयातील माजलगांव येथील सर्वसामान्य कुटुंबातील दिलीपराव श्रीरंगराव लंगे या शेतक-याची कन्या असून तिने अभ्यास, व्यासंग, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चमक दाखवून गुरुकुलाचे नांव रोशन केले आहे.
तिच्या या यशाबद्दल प.पू. आत्मा मालिक माऊली, आत्मा मालिक ध्यानयोग मिषनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, माधवराव देशमुख, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या बालनाटयस्पर्धेतील यश प्राप्त विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, उपप्राचार्य रमेश कालेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे, रविंद्र देठे, सुनिल पाटील, योगेश निळे, अमोल नलावडे, योगेश पवार, रोहिणी कचरे, योगिनी पवार, आदींचे मार्गदर्शन लाभले.