खेळजगत
राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलचा संघ पुणे येथे रवाना
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
पुणे येथील राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे राज्यस्तरीय जुनियर नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले आहे.सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद व नाशिक या आठ विभागाच्या संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धेमध्ये पुणे ववभागाचे नेतृत्व गौतम पब्लिक स्कूलचा संघ करणार आहे.
ऑक्टोबर मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत (१४ वर्ष वय) गौतम पब्लिक स्कूलने राज्यतरावर प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचे सार्थक पटारे, वैभव देसले जनार्दन सापते या खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली असल्याची माहिती स्कुलचे प्राचार्य नुर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दि. ३० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालवधित पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जुनियर नेहरू हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी संघ पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे. सदर स्पर्धाच पुणे येथे बिबवेवाडी येथे पार पडणार आहेत.ऑक्टोबर महिन्यात दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. सदर राष्ट्रीय स्पर्धाच दिल्ली येथे दि.१७ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत पार पडल्या असून दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलने लक्षवेधी कामगिरी केली आहे.
ऑक्टोबर मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत (१४ वर्ष वय) गौतम पब्लिक स्कूलने राज्यतरावर प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचे सार्थक पटारे, वैभव देसले जनार्दन सापते या खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली असल्याची माहिती स्कुलचे प्राचार्य नुर
शेख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.सर्वच स्पर्धेमध्ये कार्तिक पटारे, सार्थक पटारे, पार्थ देशमुख, साई बडवर, तेजस सोनवणे, वैभव देसले जनार्दन सापते, ओम भाबड, सुशांत बेंडसे, हर्षद काकडे, पॉल रितेश, सागर खडसे , दरोडे प्रमोद,श्रीयोग भालेराव, समर्थ गोंदकर, संग्राम कोते,आदी खेळाडूनीं लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन केले.
गौतमच्या या विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष, माजी.आ.अशोक काळे, नूतनआमदार आशुतोष काळे,जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, स्नेहलताई शिंदे, आदींनी अभिनंदन केले आहे.