जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

कोपरगावात वैकुंठ रथाचे लोकार्पण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील अंबिकानगर येथे मोरे परीवाराच्या वतीने ताराआई मोरे यांच्या द्वितीय स्मरणार्थ नुकताच गंगापूर येथील भन्ते उपाली यांचे प्रमुख उपस्थितीत माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्या हस्ते सगुती रथाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी धम्ममेघ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भिक्खु आनंद सुमन सिरी यांना सुगती रथाच्या चाव्या चि.शौर्य नितीन मोरे व मोरे परिवार यांच्या हस्ते सुपूर्त केल्या आहेत.तसेच यापुढील काळात देखभाल दुरुस्तीची जबाबदारी या कुटूंबाने स्वीकारली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

स्व.ताराआई मोरे यांनी अत्यन्त प्रतिकूल कालावधीत कष्ट उपसून आपला प्रपंच चालवुन आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले होते.त्यातून त्याचा जेष्ठ सुपुत्र रावसाहेब मोरे हे एम.एस.ई.बी.भुसावळ डिव्हिजन येथे कार्यरत आहे तर कनिष्ठ चिरंजीक नितीन मोरे हे एम.एन.सी.कंपनी सिंगापूर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत.गेल्या दोन वर्षांपूर्वी कोविडचा काळ चालू असताना आईचे दीर्घ आजाराने निधन झाले परंतु अंत्यविधीसाठी घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत रथ न मिळाल्याने आईला रुग्णवाहिकेमधून अंत्यविधी करण्यासाठी नेण्यात आले.त्याची खंत दोन्ही भावांच्या मनात होती.त्यांनी आईच्या द्वितीय स्मरणार्थ वैकुंठ (सुगती) रथाचे लोकार्पण करण्याचे ठरवले होते.ते स्वप्न आज साकारले आहे.

सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव एक्स सर्विसमन असोशियनचे अध्यक्ष युवराज गांगवे,उपाध्यक्ष मारुती कोपरे,सचिव श्री निंबाळकर,पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब,राज दिवेकर,भिमराज गंगावने,अजय विघे,श्री सोनवणे,गणेश पवार,आनंद सोनपसारे,माजी नगरसेवक अरविंद विघे,संजय कांबळे,अनिल नवगिरे,दगुजी साबळे,अजय पाटील,विजय भातणकर,संजय दुशिंग,नाना रोकडे,मनोज शिंदे,नितीन शिंदे,मयूर दुशिंग,बुद्धिस्ट यंग फोरमचे अध्यक्ष विजय त्रिभुवन आदिसंह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या उपक्रमाबाबत मोरे परिवाराचे कौतुक होत आहे.सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ मेहरखांब यांनी केले आहे.तर आभार संजय कांबळे यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close