सामाजिक उपक्रम
कोपरगावात..या मंडळाचा लक्षवेधी सामाजिक उपक्रम
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात गणेशोत्सवात अंबिका तरुण मंडळाच्या वतीने लहानमुलांसाठी आधार कार्ड नोंदणी व मोबाईल लिंक करणे आदी कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.त्याला नागरिकांनी व लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतीसाद दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या उपक्रमाबद्दल या मंडळाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
कोपरगाव शहरातील अंबिका मंडळाने या निमित्त गावठाण येथील भवानी मंदिर परिसरात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वर्तमानात जनतेला काय आवश्यक गरज आहे याचा शोध घेऊन त्या दिशेने आपले पावले वळवली असून त्या साठी कृतीची जोड दिली आहे.त्यात नवीन मुलांना आधार कार्ड काढून देणे याशिवाय मोबाईल आधार लिंक करणे,अपघाती पोस्टल विमा काढणे,ज्या नागरिकांनी कोरोना साथीला प्रतिबंध करणारी बूस्टर डोस देणे आदी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करून सामाजिक उपक्रम राबविला आहे.
वर्तमानात गणोशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.कोपरगाव शहर त्याला अपवाद नाही.त्या निमित्त गणेश मंडळे विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.कोपरगाव शहरातील अंबिका मंडळाने या निमित्त गावठाण येथील भवानी मंदिर परिसरात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वर्तमानात जनतेला काय आवश्यक गरज आहे याचा शोध घेऊन त्या दिशेने आपले पावले वळवली असून त्या साठी कृतीची जोड दिली आहे.त्यात नवीन मुलांना आधार कार्ड काढून देणे याशिवाय मोबाईल आधार लिंक करणे,अपघाती पोस्टल विमा काढणे,ज्या नागरिकांनी कोरोना साथीला प्रतिबंध करणारी बूस्टर डोस घेतलेला नाही त्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने बूस्टर डोससाठी शिबिराचे आयोजन केले आहे.
त्यासाठी त्यांना नगर पोस्ट खाते,टाटा इन्शुरन्स कंपनी,कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभाग आदिचे सहकार्य लाभले आहे.या उपक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला आहे.
या उपक्रमास विनायक गायकवाड,शुभम गायकवाड,संकेत अधिकार,गोपी गायकवाड,नंदन वाघमारे,रवी वाघमारे,हर्षल जाधव,वामन गोसावी,गोपी खैरे,तन्मय गायकवाड,फर्दींन बेग,निलेश वाघमारे,विकी जोशी,पवन कोळपकर,विकी गोसावी,अन्वर शहा,गौरव कोऱ्हाळकर,अभिषेक गायकवाड,अभिजित भुजबळ,निखिल तांबे,राहुल आदमाणे,सागर गायकवाड,सुमित राखपसारे,सुमित कुलकर्णी,आयुष ठाकूर नाना तिरसे,दर्शन धाडीवाल,आदींचे सहकार्य लाभले होते.