जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

लोहगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

लोहगाव-(वार्ताहर)

राहाता तालुक्यातील लोहगाव येथे अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात आले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे.अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो.

लोहगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित अंतराचे तंतोतंत पालन करून जयंती साजरी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाही अण्णाभाऊ साठे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री सुर्यवंशी हे होते. कार्यक्रमास विखे-पाटील कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब घेतले,सोसायटी अध्यक्ष राजेंद्र घेतले,माजी अध्यक्ष भास्कर घेतले, उपसरपंच सुरेश चेचरे,शाताराम चेचरे,किरण चेचरे,पत्रकार कोडीराम नेहे, शशिकांत अंत्रे,श्री कदम सर,महेश सुरडकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमा प्रसंगी श्री सुर्यवंशी,भाऊसाहेब चेचरे,कदम सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले,लोकशाहिर अण्णाभाऊ साठे युवा मंच‌‌‌ च्या वतिने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात.युवा मंचचे अध्यक्ष बबनराव ठोंबरे उपाध्यक्ष देविदास पवार,खजिनदार अशोक खरात,सचिव चांगदेव पगारे,सल्लागार सुरेश शेलार,सतिश पोकळे,सोपान पगारे,सोमनाथ पवार,ऋतीक बलस्थाने,लक्ष्मण रोकडे,सागर वडांगळे,मंगेश पगारे,ज्ञानेश्वर पगारे,अजय साळवे,श्रीकांत खरात,नितिश खरात,हर्षल बलस्थाने,प्रविण खवळे,रामनाथ पवार,संपत कसबे,मच्छिद्र साळवे आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close