सामाजिक उपक्रम
…या गावी आरोग्य शिबिराचे आयोजन

न्यूजसेवा
धामोरी- (दत्तात्रय घुले )
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे सद्गुरू प.पु.मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पीटल ट्रस्ट गुरुपीठ क्षेत्र त्रंबकेश्वर आयोजीत अंतर्गत सुरु असलेल्या धामोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात नुकतेच ग्रामस्थांसाठी मोफत नाडी पारिक्षण आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित केले होते.

दरम्यान या वेळी परिसरातील धामोरी,मायगाव देवी,शिरवाडे वाकद,मोर्वीस,चासनळी,मंजुर येथील श्री स्वामी समर्थ सेवेकरी व महिला पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिंडोरी येथील सदगुरू प.पू.मोरेदादानी ७०-८० वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वर येथील भूमीत पायी फिरून सदविचार पेरला होता.दारिद्र,दु:ख निर्मुल याचे उपाय सांगितले होते,दीन दलिताची,दारिद्र नारायणाची सेवा केली होती.त्याचा आता मोठा विशाल वटवृक्ष झाला आहे.आता याचा सुधंध सर्वत्र दरवळत आहे.सदर ठिकाणी वर्तमानात “१०० खाटाचे”सदगुरू प.पू.मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठच्या पुढाकाराने सुरू असून आता ग्रामीण भागात त्यांची शिबिरे जनहितार्थ सुरू आहे.कोपरगाव तालुक्यातील धामोरी या ठिकाणी ते उत्साहात संपन्न झाले आहे.

या वेळी परिसरातील धामोरी,मायगाव देवी,शिरवाडे वाकद,मोर्वीस,चासनळी,मंजुर येथील श्री स्वामी समर्थ सेवेकरी व महिला पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.या नाडी पारिक्षण आरोग्य शिबिर आयोजन यशस्वीतेसाठी त्र्यंबकेश्वर येथील डॉ.मोहन गौरकर,डॉ.उज्वलासिंग सोलकी,श्री.माळी सर कोपरगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रप्रमुख वनिता भुजबळ,वडाळी ताई धामोरी येथील केंद्रप्रमुख भाऊसाहेब खिलारी,कैलास माळी,राजेंद्र वाईकर,अशोक घुले,सेवकरी माहिला माधुरी घुले,मेघा चिणे आदी आदींनी सहभाग नोंदविला होता.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



