सामाजिक उपक्रम
चालकाचा प्रामाणिकपणा,५५ हजारांचा ऐवज परत!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील वत्सला इंग्लिश मिडीयम स्कूल मधील वाहन चालक संतोष गजाराम पवार हे काल दुपारी पोहेगावं हद्दीतील गणपती मंदिराजवळ आपले वाहन चालवत असताना एक बेवारस पडलेली काळ्या रंगाची बॅग सापडली असून त्यात त्यांना सदर बॅग मालकाचे आधार कार्ड मिळून आल्यावर त्यांनी सदर बॅग जवळके येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय थोरात यांचेकडे दिली होती.त्यांनी ती बॅग संस्थेचे प्राचार्य महेंद्र रोहमारे यांचेकडे सोपवली होती त्यांनी सदर व्यक्तीचा शोध घेऊन ती बॅग अजित सोमनाथ थोरात यांना परत केली आहे.याबाबत सदर संतोष पवार या चालकाच्या प्रमाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरची बॅग ही धोंडेवाडी येथील रहिवासी अजित सोमनाथ थोरात यांची असल्याचे दिसून आले होते.त्यानुसार संबंधितांनी त्यांचेशी संपर्क साधून त्यांना वत्सला इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बोलावून घेतले होते.त्यावेळी वाहन चालक संतोष पवार यांचे प्रामाणिकपणा बद्दल थोरात व संस्थेचे प्राचार्य महेंद्र रोहमारे हे बक्षीस देत असताना मात्र संतोष पवार यांनी विनम्रपणे ते नाकारले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आजच्या जगात प्रामाणिक माणसांची कमतरता ही एक गंभीर समस्या आहे,कारण अनेक लोक वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी किंवा समाजाच्या दबावाखाली खोटेपणा स्वीकारतात.ही कमतरता नातेसंबंध,सामाजिक व्यवहार आणि एकूणच नैतिक मूल्यांवर परिणाम करते.या समस्येवर मात करण्यासाठी,समाजात प्रामाणिकपणा वाढवणे, नैतिक मूल्यांना महत्त्व देणे आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे.मात्र वर्तमानात प्रमाणिक माणसांची कमतरता भासत असताना व तो कलियुगाचा महिमा असताना काही व्यक्ती आपल्या प्रमाणिक पणाची झलक दाखवून अनेकांना आश्चर्याचा धक्का देताना दिसत आहे.अशीच एक घटना पोहेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत उघडीस आली आहे.त्याच हद्दीत वत्सला इंग्लिश मिडीयम स्कूल असून त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या गावातून विद्यार्थी आपल्या गाडीने पोहच अथवा ने आण करावे लागत असतात.सदर खाजगी संस्थेचे वाहन चालक संतोष पवार हे आपल्या गाडीने विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात असताना त्यांना पोहेगाव हद्दीतील गणपती मंदिराजवळ एक बेवारस स्थितीत पडलेली बॅग आढळून आली होती.त्यांनी ती गाडी थांबवून पाहिली असता त्यात बरेच सामान असल्याचे त्यांना जाणवले होते.त्यांनी आपले सहकारी विजय थोरात यांचेकडे सुपूर्त केले होती व दोघांनी मिळून त्यांनी ती संस्थेचे प्राचार्य महेंद्र रोहमारे यांचे समक्ष उघडुन पाहिली असता त्यात त्यांना आधार कार्ड व अन्य बरेच सामान आढळून आले होते.त्यात रोख रुपये १३ हजार,दोन मोबाईल प्रत्येकी किंमत किमान २०-२५ हजार असा एकूण ५०-५५ हजारांचा ऐवज आढळून आला होता.
त्यानुसार सदरची बॅग ही धोडेवाडी येथील रहिवासी अजित सोमनाथ थोरात व वाल्मीक सोमनाथ थोरात यांची असल्याचे दिसून आले होते.त्यानुसार संबंधितांनी त्यांचेशी संपर्क साधून त्यांना वत्सला इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बोलावून घेतले होते.त्यावेळी वाहन चालक संतोष पवार यांचे प्रामाणिकपणा बद्दल थोरात व संस्थेचे प्राचार्य महेंद्र रोहमारे हे बक्षीस देत होते.मात्र संतोष पवार यांनी विनम्रपणे ते नाकारले आहे.त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोहेगाव,जवळके,चांदेकासारे आदी परिसरासह कोपरगाव तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.



