सामाजिक उपक्रम
…या शहरात वृक्ष लागवड संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील प्रभाग क्र.४ मध्ये डॉ.कुणाल घायतडकर व डॉ.भाग्यश्री घायतडकर यांच्या पुढाकारातून सप्तशृंगी देवी मंदिर परीसर व श्री दत्त मंदिर परीसरात आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले आहे.

- “निसर्गाशी मैत्री करणं ही काळाची गरज आहे.झाडं ही केवळ हरित छटा नसून,ती आपल्या भविष्याचा श्वासं आहेत.वाढत्या प्रदूषणाच्या संकटात,एक झाड लावणं म्हणजे केवळ रोपटं रोवणं नव्हे,तर ते जगवून पर्यावरणाचं नातं जोपासणं आहे”-आ.आशुतोष काळे, कोपरगाव.
यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,”निसर्गाशी मैत्री करणं ही काळाची गरज आहे.झाडं ही केवळ हरित छटा नसून,ती आपल्या भविष्याचा श्वासं आहेत.वाढत्या प्रदूषणाच्या संकटात,एक झाड लावणं म्हणजे केवळ रोपटं रोवणं नव्हे,तर ते जगवून पर्यावरणाचं नातं जोपासणं आहे.माझी आई सौ.पुष्पाताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करतांना मला समाधान वाटतं की, आपण पर्यावरणाच्या संवर्धनाचा वसा घेत आहोत. निसर्गाचा समतोल राखल्याशिवाय विकासाचं चक्र पूर्ण होऊ शकत नाही.निसर्गाने आपल्याला अन्न,पाणी,हवा,औषधे दिली.झाड लावणं ही त्या ऋणाची परतफेड म्हणून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणं ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.