सामाजिक उपक्रम
….या समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे आज सकाळी ११ वाजता महात्मा गांधी सभागृहात मोफत मराठा वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला होता त्यात मोठ्या संख्येनं मराठा समाजातील नागरिकांनी भाग घेतला असला तरी त्यात विक्रमी ४३५ मुलांचे तर मुलींचे केवळ ४७ परिचय पत्र संस्थेकडे जमा करण्यात आले असल्याने मुलींच्या टंचाईची दाहक स्थिती पुन्हा एकदा समोर आली असल्याचे दिसून आले आहे.मात्र या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे या मराठा समाज वधू-वर मेळाव्याला कोपरगाव तालुका मराठा समाजाने प्रथमच आपल्या स्वाभिमानाचे प्रथमच दर्शन घडवले आहे व लोकवर्गणीतून हा उपक्रम संपन्न केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वर्तमानात समाजातील मुला-मुलींच्या संख्येतील असमतोलामुळे मुलांचे लग्न जमणे महाकठीण झाले आहे.काही पालक या समस्येवर मात करून मुलाचे लग्न जमवण्याचा प्रयत्न करतात व त्यात यशस्वी होतात.पण पुढे ते लग्न टिेकेल की नाही या विचाराने हैराण होतात.सजसा काळ बदलतो तसतशा समाजाच्या गरजा व समस्यादेखील बदलत जातात.साधरणत: एक दोन दशकापूर्वी,आपल्या मुलीचे लग्न जमवणे व ते सुखरूप करून देणे यासाठी मुलीचे वडील कर्जबाजारी होत असे.त्याचाच एक परिणाम म्हणून की काय,समाजातील काही दाम्पत्यांनी मुलगी नको असा सूर लावला व तो प्रत्यक्षात उतरवलादेखील.परिणामी समाजातील मुलींची संख्या कमी झाली.अशा पालकांच्या मते कुटुंबाचा खर्च आणि मुलीचे लग्न जमवण्यासाठी होणारा त्रासही कमी झाला.पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही.मुलगी नको म्हणणार्या दाम्पत्याचा मुलगा जेव्हा लग्नाचा झाला तेव्हा मात्र त्याला सून म्हणून मुलगी मिळेनाशी झाली.परिस्थितीशी तडजोड करून मार्ग काढून अनेक बापांनी मुलांचे लग्न लावून व संसार थाटून दिला.मात्र हे प्रत्येकाच्या नशिबात नाही.मुलींचा जन्मदर घटल्याने त्याला नगर जिल्हाही अपवाद नाही.येथील मुलीचा जन्मदर ०१ हजार मुलांमागे ८५२ इतका किमान पातळीवर आला आहे.त्यामुळे लग्न ही वर्तमानात गंभीर समस्या बनली आहे.त्यामुळे आता जवळपास बहुतांशी मुलाचे बाप आता मुलीच्या बापाच्या घरी पायधूळ झाडत असताना दिसत आहे.

आज कोपरगाव येथे आयोजित केलेल्या वधू वर मेळाव्यात उपवर तरुण ४३५ इतक्या मोठ्या संख्येने आले होते पण; वधू किती आल्या म्हणाल तर केवळ ४३ इतक्या.म्हणजेच सरासरी १०० मुलांपाठीमागे केवळ १० हे कठोर वास्तव आजच्या मराठा समाजाचे समोर आले आहे.त्यावर मंथन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या उलट स्थिती तींस वर्षापूर्वी होती.मुलींचे बाप मुलांचे घरी पायधूळ झाडत होते.आणि त्यावेळी मुलींच्या बापास तूच्छतेची वागणूक मिळत होती.परिणामी आगामी काळात अवैध रित्या गर्भपात होऊन मुलंच जन्मदर घटण्यावर झाला होता.त्यावेळी हुंडा आणि अपेक्षांचे ओझे मुलींच्या बापास पेलेनासे झाल्याने आज काळाने मुलांच्या बापावर आज सुड उगवला असे म्हंटले तर वावगे वाटू नये.त्यामुळे आज परिस्थिती गंभीर बनली आहे.इतकी आज प्रत्येक गावात तीसी आणि चाळिशी ओलांडलेल्या तरुण चौकाचौकात दिसत आहे.त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडू लागले आहे.या परिस्थितीचा कधीही स्फोट होऊ शकतो अशी स्थिती आहे.याची दखल घेऊन कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी महात्मा गांधी प्रदर्शन हॉल या ठिकाणी मराठा वधू वर मेळावा आयोजित केला होता.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.उपवर तरुण ४३५ इतक्या मोठ्या संख्येने आले हे खरे आहे पण वधू किती आल्या म्हणाल तर केवळ ४३.म्हणजेच सरासरी १०० मुलांपाठीमागे केवळ १० हे कठोर वास्तव आजच्या मराठा समाजाचे समोर आले आहे.त्यामुळे राजकीय अथवा समाज धुरिणांनी याची गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.त्यामुळे आजच्या वधू वर सूचक मेळाव्यास महत्व आले आहे.
सदर प्रसंगी ‘गोदावरी-परजणे’ सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,’महानंद’चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे,विमल पुंडे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने वधू-वर व त्यांचे माता-पिता व जवळचे आप्तेष्ट उपस्थित होते.विशेष म्हणजे या मेळाव्याला मराठा समाज आपल्या स्वाभिमानाचे प्रथमच दर्शन घडवले आहे व लोकवर्गणीतून हा उपक्रम संपन्न केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी प्रास्तविक ऍड.योगेश खालकर यांनी केले तर सूत्र संचालन प्रतीक गवळी यांनी केले आहे.उपस्थितांचे आभार शिवाजी ठाकरे यांनी मानले आहे.यावेळी नागरिकांना भोजनाचे आयोजन आयोजकांनी केले होते.यात अनेक मराठा तरुणांनी मोठे योगदान दिले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.