सामाजिक उपक्रम
….येथे मराठा संस्थेचा वधू वर मेळावा होणार !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा आयोजित केला असल्याची माहिती सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने विनय भगत व अशोक कुटे यांनी दिली आहे.

आपल्या मुलीला नोकरीवालाच नवरा मिळवून द्यायच्या या मानसिकेतपोटीच बहुतांश पालक आपल्या मुली शेतकरी तरुणांना द्यायला तयार होत नसल्याचं या पाहणीतून पुढे आलंय.शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढतंय त्यामुळे या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे हे वास्तव आहे.
सरकार एकिकडे शाश्वत शेतीच्या गप्पा मारत असतानाच तिकडे ग्रामीण भागात मात्र,शेती कसणाऱ्या लग्नाळू युवकांना कोणी पोरीच द्यायला तयार नाहीये.सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक्षणातून हे भयावह वास्तव समोर आलंय.अहील्यानगर जिल्ह्यातल्या ४५ गावांमधून सात वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आलं त्यात शेती व्यवसायाशी निगडित असल्याने तब्बल ०३ हजार ०६८ तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलं होत.आपल्या मुलीला नोकरीवालाच नवरा मिळवून द्यायच्या या मानसिकेतपोटीच बहुतांश पालक आपल्या मुली शेतकरी तरुणांना द्यायला तयार होत नसल्याचं या पाहणीतून पुढे आलंय.शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढतंय.पण या शिकलेल्या मुलींचा लग्नासाठीचा कल मात्र,नोकरदाराकडे वाढताना दिसतोय.मुलगा एखाद्या कंपनीत शिपाई असला तरी चालेल पण तो नोकरीला असला पाहिजे.अशीच भूमिका आता ग्रामीण भागातल्या मुली बोलून दाखवत आहेत.पूर्वी त्यांच्याकडे मुलींचे बाप हेलपाटे मारायचे आता मात्र,चित्रं नेमकं उलटं आहे.गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याकडे मुलांचे वडील चकरा मारत असल्याचंही या सर्वेक्षणात आढळून आले.विवाह रखडल्याने या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचेही दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर विवाह जमविणाऱ्या सामाजिक संस्थांची जबाबदारी वाढत चालली आहे या पार्श्वभूमीवर हा कोपरगाव शहरात हा मेळावा आयोजित केला आहे.
हा मेळावा नेहमीप्रमाणे मोफत असून ९५ वा मेळावा गुरुवार दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट हॉल मध्ये कोपरगाव शहर जिल्हा आहिल्यानगर येथे होणार आहे.तरी जास्तीत जास्त वधु वर पालकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन विकास आढाव,भरत मोरे,अनिल गायकवाड,शिवाजी ठाकरे, अमित आढाव,ॲड.योगेश खालकर,अशोक आव्हाटे,बबलू वाणी,संदीप डुमरे,विजय जाधव,राजेंद्र वाकचौरे,मनोज नरोडे,विश्वास मुराडे,नंदू डांगे,वडांगळे सर,विनय भगत आदींनी केले आहे.
मराठा सोयरीक संस्थेने आतापर्यंत ९४ यशस्वी वधू वर मेळावे मोफत घेतले आहेत.या संस्थेकडून आतापर्यंत ४५०० लग्न पार पाडलेले आहेत.त्यापैकी ६०० लग्न हे विधवा,विदुर, घटस्फोटीत यांचे पार पडलेले आहेत.धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी करून या मेळाव्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करून ही शासनमान्य संस्था असल्याचा त्यानी केला आहे.
या मेळाव्यासाठी येताना वधू-वरांनी स्वतः आधार कार्ड झेरॉक्स,परिचय पत्र घेऊन पालकांसह मेळाव्यास यायचे आहे.अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत.अधिक माहितीसाठी मो.क्रं.९५९५२०३९९१ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.