धार्मिक
भगवान कृष्ण कार्याचे गुणगान तर भगवान रामाचे आचरण करा-…या महाराजांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भगवान कृष्णांनी ज्या वयात अनेक अतुलनीय कार्य केले,ते कोणी कितीही मोठा असला तरी त्याचे आचरण करु शकत नाही.त्यामुळे ते श्रवणीय गणले जाते तर भगवंताने रामावतारात जे चरित्र केले,त्याचे अनुकरण सामान्य जीव करू शकतो अशी असल्याने त्याचे जीवनात आचरण तर कृष्णाचे केवळ गुणगान करावे असे प्रतिपादन ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी नुकतेच खंडाळा येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“कृष्ण हे हिंदू धर्मातील प्रमुख देवांपैकी एक आहेत.ते विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून पुजले जातात.कृष्ण हे संरक्षण,करुणा,माया आणि प्रेमाचे देव असून ते भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि फार मोठ्या प्रमाणावर पूजले जातात.कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला.भारतीय युद्धात भगवान कृष्ण हे पांडवांच्या बाजूने लढले.महाभारतात म्हटले आहे की,कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही.हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते”-ह.भ.प.संजय महाराज जगताप.
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणआयोजित केले होते त्या निमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात ते
“ये दशे चरित्र केले नारायणे। रांगता गोधने राखिताहे ॥१॥
हे सोंग सारिले या रूपे अनंते। पुढे ही बहु ते करणे आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे। केला नारायण अवतार ||३||
या अभंगाचे विवेचन करताना ते बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कृष्ण अवतारातील कार्य हे जीव कोटीतील कोणीही करू शकणार नाही,म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे फक्त गुणगान करावे त्याचे आचरण करायचे नाही.त्यांच्या लिलांचे वर्णन करावे.राम अवतार लीला आचरणात आणल्याने मानवाला पुण्याचा लाभ होतो,परंतु कृष्ण अवतारातील लीला उच्चारल्याने पुण्याचा लाभ होतो.हा फरक समजून घेणे गरजेचे आहे.भगवंताने बालपणीच वेगवेगळ्या लीला केल्या दुष्टांचा नाश व सज्जनांचे रक्षण केले.त्यांनी अनेक राक्षसांचा नाश केला.परंतु गोकुळाचे रक्षण ही केले असल्याचा उपदेश संजय महाराज जगताप यांनी केला आहे.
भगवान कृष्णा बाबत सविस्तर बोलताना ते म्हणाले की,”कृष्ण हे हिंदू धर्मातील प्रमुख देवांपैकी एक आहेत.ते विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून पुजले जातात.कृष्ण हे संरक्षण,करुणा,माया आणि प्रेमाचे देव असून ते भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि फार मोठ्या प्रमाणावर पूजले जातात.कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला.भारतीय युद्धात भगवान कृष्ण हे पांडवांच्या बाजूने लढले.महाभारतात म्हटले आहे की,कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही.हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते ते याच अर्थाने.भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे.कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले.कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशे सत्तावीस वर्षे होते असे मानले जाते.महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली ती याच अर्थाने असेही त्यांनी उपस्थितांना शेवटी सांगितले आहे.त्यांचे हरी कीर्तन उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन ऐकत असल्याचे दिसून आले आहे.