जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

वर्षभरात साई संस्थांनला…इतक्या कोटींची देणगी प्राप्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेला दि.०१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षभराच कालावधीत साईभक्‍तांकडून विविध प्रकारे ४०० कोटी १७ लाख ६४ हजार २०१ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.


श्री.जाधव म्‍हणाले की,”जगाच्‍या व देशाच्‍या कानाकोप-यातुन श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी लाखो साईभक्‍त शिर्डी येथे येतात. साईभक्‍तांकडून दि.०१ जानेवारी ते दिनांक ३१ डिसेंबर २०२२ या वर्षभराच्‍या कालावधीत विविध प्रकारे रोख स्‍वरुपात एकूण ४०० कोटी १७ लाख ६४ हजार २०१ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.

यामध्‍ये दक्षिणापेटी मोजणी रुपये १६७ कोटी ७७ लाख ०१ हजार ०२७, देणगी काऊंटर ७४ कोटी ३२ लाख २६ हजार ४६४ रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये १४४ कोटी ४५ लाख २२ हजार ४९७ रुपये आदीव्‍दारे रोख स्‍वरुपात ३८६ कोटी ५४ लाख ४९ हजार ९८८ रुपये प्राप्‍त झाले.तर २६०५३.२७० ग्रॅम सोने व ३३०२९०.४४० ग्रॅम चांदी याव्‍दारे १३ कोटी ६३ लाख १४ हजार २१३ रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close