धार्मिक
कोपरगावात ..या ठिकाणी चक्रधर स्वामी अष्टशताब्दी अवतार दिन महोत्सव

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात उद्या दि.२९ ऑगष्ट रोजी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी अवतार दिन महोत्सव विविध आचार्य गणाचे उपस्थितीत कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात संपन्न होत असल्याची माहिती कोपरगाव तालुका महानुभाव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत.’लीळाचरित्र’ या मराठीतील पहिला चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्र’ याचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामीच आहेत.इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.त्यांचा यंदा अष्टशताब्दी अवतार दिन कोपरगाव शहरात मान्यवर संत-महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
श्री चक्रधर स्वामीच यांना इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.त्यांचा यंदा अष्टशताब्दी अवतार दिन कोपरगाव शहरात मान्यवर संत-महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन अष्ट शताब्दी महोत्सवानिमित्त होणारा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी करावा असे आवाहन आचार्य महंत राजधर बाबा यांनी केले आहे.
दरम्यान या उत्सवानिमित्त राज्यातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.त्यात साहित्याचार्य ऋषीराज महाराज,विध्वंस महाराज,बाभुळगावकर बाबा शास्त्री,राजधर बाबा,यशराज महाराज,गोमेराज बाबा विध्वंस आदिंचा समावेश आहे.
या निमित्ताने पहाटे ५ वाजता श्री मूर्तीस अभिषेक करण्यात येणार आहे.त्या नंतर ७ वाजता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरित्र पारायण करण्यात येणार आहे.सकाळी ९ वाजता श्वाजारोहन कार्यक्रम संपन्न होणार आहे.तर ९.३० वाजता उपस्थित मान्यवर संत-महंतांच्या उपस्थितीत धर्म सभा संपन्न होणार आहे.दुपारी १२ वाजता महाआरती संपन्न होणार आहे.तर दुपारी १२.३० वाजता उपस्थित भाविकांना महा प्रसासादाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा लाभ कोपरगाव,संवत्सर,जेऊर कुंभारीसह तालुक्यातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक कोपरगाव तालुका महानुभाव समितीने केले आहे.