जाहिरात-9423439946
शैक्षणिक

संस्था व्यवस्थापनात कार्यालय विभाग महत्वाचा-रासवे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

संस्था व्यवस्थापन,प्राचार्य,शिक्षक व विद्यार्थी यामधील महत्वाचा सेतु म्हणजे कार्यालय विभाग हा असतो. हा विभाग जर सुशिक्षित व प्रशिक्षित असेल तर महाविद्यालयाचा विकास निश्चितच होतो. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणीक विभागाचे उपसचिव मुंजाजी रासवे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

व्यवस्थापन हा एक आधुनिक काळातील परवलीचा शब्द बनला आहे.प्रत्येक कृती ही व्यवस्थापना भोवती फिरत असते.इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय.व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे,संघटन करणे,समन्वय साधने,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय.व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.कोणतेही क्षेत्र असो सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक व शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे हि कार्यशाळा आयोजित केले होते.

कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्यस्तरीय ई-कार्यशाळा आयोजित केली होती त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे उपस्थित होते.

या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,मुंबई विद्यापीठ,कोल्हापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील जवळपास ९० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

सदर प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले की,”विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी नवनवीन कल्पना राबवून विविध तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासकीय कामात योगदान दिले पाहिजे.कार्यालयीन कामकाज पारंपारिक पद्धतीने न करता डिजिटल संकलनावर भर दिल्यास काम व वेळेत बचत होईल असेही ते शेवटी म्हणाले आहे.
‌ सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी,”आजचा विद्यार्थी हा देशाचा कणा असतो.आपल्या देशाचे उज्वल भविष्य विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहे.चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी चांगले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तयार झाले पाहिजे.त्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज असते असे नमूद केले आहे.
या कार्यशाळेचे यशस्‍वीपणे आयोजन केल्‍याबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोयायटीचे सचिव अॅड.एस.डी.कुलकर्णी व विश्‍वस्‍त संदीप रोहमारे यांनी कौतुक केले.
या राज्यस्तरीय कार्यशाळेचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी केले.तर कार्यशाळेचे सूत्रसंचलन डॉ.संजय दवंगे यांनी केले तर संजय पाचोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close