धार्मिक
…या गावातही आषाढी महोत्सव उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात.या उत्सवाचा आनंद अनुभवण्यासाठी तालुक्यातील पढेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडीत चिमुकल्यांच्या मधुर वाणीतून विठु नामाचा गजराने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हा उत्सव पढेगावतही मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.राज्यातही हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथेही तो उत्साहात संपन्न झाला आहे.
या दिंडीच्या निमित्ताने चिमुकल्या मुलींच्या साडी चोळीचा पेहराव विशेष आकर्षण ठरत होता.शाळेपासुन पांडूरंगाच्या मंदिरासमोरील प्रांगणात भजने आणि फुगड्यांनी आणि विठु नामाच्या गजराने अल्पकाळ आसमंत दुमदुमुन गेला होता.यात ग्रामस्थ भजनी मंडळींनी देखील हिरारीने भाग घेतला.त्यानंतर या दिंडीने गावातील ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराकडे प्रस्थान केले.तेथे मंदिर व्यवस्थापक कचुनाना शिंदे यांनी सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था केली होती.
सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ सोळसे उपशिक्षक रमेश ठोकळ,बाबासाहेब महानुभाव विद्युल्लता आढाव,शबाना तांबोळी,शिवगंगा काळेबेरे,शोभा मढवई,इंदुमती वाबळे, आरती वाघ,मंदाकिनी भोसले,भैरवनाथ बाराहाते आदिंनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.