धार्मिक
शिर्डीत परिघातील साईभक्तांना दर्शन पासची सुविधा करा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थान मंदिर दर्शन व्यवस्था मध्ये पेड पास व गावकऱ्यांना मोफत दर्शनासाठी परवान्याची व्यवस्था आहे.मात्र काही असामाजिक तत्व संगणका वर अवैध पास,आधार कार्ड तयार करत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्री साईबाबा संस्थानने चौकशी पथक नेमावे असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शिर्डीतील स्थानिक गावकरी व ग्रामस्थ यांना गावकरी पास देण्याची सुविधा संस्थानने सुविधा केली आहे.मात्र नजीकच्या शिर्डी नजीच्या पंधरा कि. मी.परिघातील गावातील भाविक साई दर्शनापासून वंचित रहात आहे.त्याचा काही असामाजिक तत्व गैरफायदा घेत असून त्यातून आपली तुंबडी भरून घेत आहे.त्याला आळा घालणे गरजेचे आहे”-नितीन शिंदे,तालुकाध्यक्ष,कोपरगाव तालुका काँग्रेस.
शिर्डीसह राज्यातील मंदिरे राज्य सरकारने मर्यादित संख्येने भक्तांसाठी खुले केले आहे.त्यामुळे आता भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे.पावणेदोन वर्षात अनेकांना आपल्या लाडक्या दैवतापासून कोरोना साथीमुळे दूर राहावे लागले आहे.मात्र आता कोरोनाचे संकट बऱ्यापैकी दूर झाले असले तरी कोरोना विषाणू संपूर्ण नामशेष झालेला नाही.त्यामुळे सरकार व भाविकांना दक्ष रहावे लागणार आहे.अशातच शिर्डी या ठिकाणी तर देशासह देशविदेशातील साई भक्तांची मोठी दर्शनासाठी मोठी गर्दी असते.काकडी विमानतळ व रेल्वे सेवेने त्यात अधिकची भर पडली आहे.त्यामुळे नजीकच्या भाविकांवर तिष्ठत राहाण्याची वेळ येते या साठी स्थानिक गावकरी व ग्रामस्थ यांना गावकरी पास देण्याची संस्थानने सुविधा केली आहे.मात्र नजीकच्या गावातील भाविक साई दर्शनापासून वंचित रहात आहे.त्याचा काही असामाजिक तत्व गैरफायदा घेत असून त्यातून आपली तुंबडी भरून घेत आहे.त्याला आळा घालणे गरजेचे आहे.हे बेशिस्त व संधिसाधू नागरिक आपल्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील साई भक्तांना गावकऱ्यांचे पास विकून आपल्या स्वभावाचे अभद्र प्रदर्शन करत असतात.त्याना आळा घालणे गरजेचे आहे.व त्यासाठी चौकशी पथके नेमून या अपवृत्तीस दंडात्मक कारवाई करावी मात्र शिर्डी नजीकच्या परिघातील पंधरा कि.मी.अंतरा वरील ग्रामस्थांना या मोहिमेअंतर्गत पास सुविधा देण्यात यावी अशी मागणीही शेवटी तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे.