जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

८३ व्या वर्षी पत्नीच्या स्मरणार्थ तीन वर्षांपासून पतीची पंढरपूर वारी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

मराठी संस्कृती पांडुरंगाचे पंढरपूर हे प्रत्येक वारकऱ्यासाठी माहेरघरच वाटत असत.आषाढीची पंढरपूरची वारी हा तर वारकऱ्यांसाठी स्वर्ग सुख सोहळाच असतो. टाळ-मृदुंग,भगव्या पताका खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करीत पायी दिंडी सोहळ्याचा आनंद लुटणाऱ्या विठ्ठलभक्तांना,”कधी भेटशी केशवा” असे म्हणत पुंडलिकाच्या भेटीची ओढ लागलेली असते.वर्षातून एकदा वारी करणाऱ्याला इतका आनंद मिळत असेल तर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ जवळपास साडेतीनशे किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा दिवसात पार करून श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या वयाचे ८३ वर्ष पार केलेल्या वारकऱ्यांचा आनंद किती मोठा असेल ? होय ही कथा नाही तर आजचे वास्तव आहे.

मार्च २०१९ मध्ये वामनराव निंबाळकर यांची पत्नी सौ.भामाबाई निंबाळकर (माई) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्याचवेळी त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ महिन्याच्या पायी वारीचा संकल्प बोलून दाखवला.सर्वांना ही गोष्ट आचंबित आणि अशक्य वाटली कारण तात्यांनी त्यावेळी वयाची ८० ओलांडलेली होती.त्यांच्या मुलांनी त्यास हरकत घेऊनही ते त्यावर ठाम होते.व गत तीन वर्षांपासून त्यांनी आपले म्हणणे पांडुरंगाच्या श्रद्धेपोटी खरे करून दाखवले आहे हे विशेष !

आपल्या महाराष्ट्रातील,संभाजीनगर (औरंगाबाद) मधील तालुका-वैजापूर मधील सिरसगावातील विठ्ठलभक्त वामनराव गंगाधर निंबाळकर हे वयाची ८३ ओलांडलेले शेतकरी वारकरी पुढच्या महिन्यात सिरसगाव ते पंढरपूर अशी सव्वीसावी पायी वारी पूर्ण करत आहे.त्यानिमित्त त्यांच्या विठ्ठलभक्तीचा आणि वारीचा घेतलेला मागोवा.

ह.भ.प.वामनराव गंगाधर निंबाळकर उर्फ तात्या हे मूळचे सिरसगाव ता.वैजापूर जि.संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शेतकरी वडिलोपार्जित शेती सावकारांनी गिळकृत केली. मात्र व्यथित न होता त्यांनी पुन्हा आपले बंधू कै.दगु निंबाळकर यांच्या मदतीने मेहनत करून आठ एकर शेती उभी केली. लहानपणापासूनच तात्यांना भजनाची आवड होती.सिरसगाव सारख्या पुण्यभूमीत संत गंगागिरीजी महाराज यांचे समकालीन संत बैरागी महाराज यांनी जिवंत समाधी घेतली होती. तिचा वार्षिक उत्सव आजही पंचक्रोशीतील भक्तमंडळी आनंदाने साजरा करतात. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तात्यांच्या पुढाकाराने सुमारे पन्नास वर्षांपासून त्यांचे सहकारी गायणाचार्य स्व.साहेबराव दुशिंग,भागाजी मलिक,विठ्ठलराव शिरसाठ, चांगदेव भवार,पुंजाराम मोरे यांच्यासह गावातील काही तरुण मित्रांनी गावात संत बैरागी महाराज भजनी मंडळाची सुरवात केली.पुढे आकाशवाणी केंद्रावर देखील या भजनी मंडळांनी आपले कला कौशल्य सिद्ध करीत संगीतप्रेमींना भुरळ घातली.भजनासह ही मंडळी इतर कला क्षेत्रात ही अग्रेसर असायची.

भारुड,ऐतिहासिक,धार्मिक प्रसंग असलेले नाट्य मंडळ यात देखील तात्यांची भूमिका असे.विशेषतः सिरसगाव गावच्या खंडोबा यात्रेत सनई आणि डफाच्या तालावर त्यांचे लाकडी घोडा सवारी नृत्य विशेष आकर्षण असे.आयुष्यात वारीची सुरुवात तात्यांनी एस.टी. बसने केली त्यांनी ब्रम्हलीन नारायणगिरी महाराज यांच्या श्री क्षेत्र सरला बेट ते पंढरपूर या दिंडी सोहळ्यात बारा वर्ष गावातील श्री संत बैरागी महाराज दिंडी सोहळ्यात सात वर्ष असा पायी दिंडी वारी सोहळा केला आहे.

पत्नीच्या समरणार्थ वारीचा संकल्प

मार्च २०१९ मध्ये तात्यांची पत्नी सौ.भामाबाई वामनराव निंबाळकर (माई) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्याचवेळी तात्यानी माईच्या समरणार्थ महिन्याच्या पायी वारीचा संकल्प बोलून दाखवला.सर्वांना ही गोष्ट आचंबित आणि अशक्य वाटली कारण तात्यांनी त्यावेळी वयाची ८० ओलांडलेली होती त्यांचे दोन्ही मुलं भाऊसाहेब आणि सुनील यांनी तात्यांची प्रकृती पाहता तुम्ही हवं तर खाजगी वाहनाने किंवा एस.टी.ने वारी करा अशी समजूत घातली मात्र तात्या आपल्या संकल्पावर ठाम होते. त्यामुळे वडिलांच्या हट्टापुढे दोन्हीही मुलांचा नाईलाज झाला.त्याच्या पुढच्याच महिन्यात एप्रिल २०१९ तात्यांनी मासिक पायी वारीची सुरूवात केली.एकादशीच्या बरोबर सहा दिवस अगोदर पहाटेच नित्य वापराचे कपडे घेऊन ते पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. शिरसगाव येथून पांडुरंगाच्या भेटीचा सुरू झालेला हा पायी दिंडीचा प्रवास विठ्ठलाचे नामस्मरण करीत नागमठाण,हरेगाव,श्रीरामपूर मार्गे पहिला मुक्काम देवळाली येथे झाला.भुकेलेल्या अन्न आणि वाटसरूला निवारा ही आपली भारतीय मराठी संस्कृती ग्रामीण भागात आजही जिवंत असल्याने त्यांना याच गावात पठारे वस्तीवर जेवणाची आणि राहण्याची सोय झाली.तात्यांचा दुसऱ्या दिवसाचा प्रवास हा नित्यनेमाने सकाळी तीन-साडे तीन वाजता सुरू होतो.यामागे निवारा देणाऱ्याला दुसऱ्या दिवशीचा ताण नको ही त्यांची सद्भावना असते.दिवसभराचा प्रवास हा साधारण पन्नास पंचावन्न किलोमीटरचा असतो.विशेष म्हणजे ते दिवसभर कोणाकडे ही थांबत ही नाही आणि जेवतही नाही.फक्त दोन बिस्कीट आणि पाणी हा त्यांचा दिवसभराचा आहार असतो हे विशेष! पुढे हा प्रवास राहुरी,विदळघाट,मादळी,साकोली मार्गे पुढे बरोबर सहाव्या दिवशी पंढरपूर मध्ये पोहचतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुन्हा ते एस.टी.ने गावाकडे माघारी फिरतात.येताना पांडुरंगाला सांगतात. देवा आता ही शेवटची वारी समज.गावी परत आल्यावर पाय सुजतात,वयोमानानुसार त्रास ही होतो मात्र जशी जशी महिन्याची एकादशी जवळ येऊ लागते तेव्हा हे ८३ वर्षाचे थकलेले वयोवृद्ध वारकरी पुन्हा कात टाकलेल्या सापासारखे चपळ होऊन पुढच्या वारीला सज्ज होतात.गावातील काही तरुण मुलांनी तसेच वारकऱ्यांनी त्यांच्यासोबत पायी वारी करण्याचा प्रयत्न ही केला मात्र त्यातले काही अर्ध्या रस्त्यातून निघून गेले. तर काहींनी तीच वारी शेवटची अनुभवली.तात्यांचा प्रवास मात्र आजही निरंतर चालू आहे घरातील सर्व मंडळी सहकार्य करतात तर त्यांचा नातू मृदुंगचार्य जयहरी निंबाळकर हा पंचक्रोशीतील नामवंत मृदुंगचार्य असल्याचे आत्मिक समाधानही बोलून दाखवतात. मध्यतरी कोविड मूळे वारीला एकदा अडचण आली आणि कोविड प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना राहुरी येथून पुन्हा माघारी जावं लागलं होत. त्यामुळे ते आता निघन्यापूर्वी आपली कोविड टेस्ट करून सोबत प्रमाणपत्र घेऊनच निघतात.पुढच्या महिन्यात तात्यांचा साविसावा संकल्प पूर्ण होत आहेत.त्या निमित्त तात्यांच्या पत्नीच्या समरणार्थ या वयात तरुणाला लाजवेल अशा अविस्मरणीय वारी सोहळ्याला खूप खूप मनापासून सलाम.

गणेश अर्जुन पवार. ( एक वारकरी )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close