धार्मिक
शिर्डीत येण्यासाठी..हि अट पाळण्याची गरज-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दिनांक १६ नोव्हेंबर २०२० दिपावली प्रतिपदे पासून श्री साईबाबा मंदिर भाविकांचेदर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे.मंदिरातील दर्शनाची सुविधा ही मर्यादित स्वरूपाची असल्याने कोरोनाचे पार्श्वभूमीवर दिवसभरात पंधरा हजार भाविकांना दर्शन दिले जाऊ शकते.यास्तव समस्त भक्तांना साईबाबा दर्शनासाठी येताना पुर्व नियोजन करुन व संस्थानचे online.sai.org.in संकेत स्थळावर online booking (सशुल्क व निशुल्क ) करुन दर्शनास आल्यास त्यांची गैरसोय होऊ शकणार नाहि असे आवाहन साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बागाटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
शिर्डीत पायी पालख्यांचे प्रमाणही अभुतपूर्व वाढत आहे.समस्त पालखी मंडळांनी देखील शिर्डीत पालख्या आणण्याचे शत-प्रतिशत टाळावे.संस्थान प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.या आवाहनाचे तंतोतंत पालन करावे.कोविड-१९चे इतर निर्बंध जसेच्या तसे चालू राहतील.समस्त साईभक्तांनी याची नोंद घेवून संस्थान प्रशासनास सहकार्य करावे-कान्हूराज बगाटे,मुख्य कार्यकारी अधिकारी.
त्यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,”वारंवार प्रसार माध्यमाद्वारे,सोशल मिडीया,दूरदर्शन,वृत्तपत्रात जाहीर प्रकटने,बातम्या देऊन अवगत करण्याचा संस्थान प्रशासनाने सातत्याने प्रयत्न केलेला आहे.तथापि या उपरही संस्थानच्या आवाहनानंतर श्री साईबाबांचेदर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी विशेषत: गुरूवार,शनिवार,रविवार आणि इतर सण अथवा सुट्टयांचे दिवशी होत असल्याने दर्शन व्यवस्थेवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येत असल्याचे निदर्शनास आलेलेआहे.सध्या कोरोनामुळे उक्त पार्श्व भूमीवर तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण २००५ व साथरोग नियंत्रण कायदा १८९७ या खाली राज्य शासनानेव जिल्हादंडाधिकारी यांनी निर्बंध जारी केलेले आहेत. त्यातच भर म्हणून इंग्लंड या देशात कोविड-१९ चा नवीन प्रकार देखील पुढे
आलेला आहे. शिर्डीत श्री साईबाबांचेदर्शनास सबंध देशविदेशातून भक्त गण येत असतात.यास्तव खबरदारीचेउपाय म्हणुन दि.१४ जानेवारी गुरुवार पासून कोविड-१९ बाबतचे शासनाचे निर्बंध शिथील होईपर्यंत भक्तांचे गर्दीवर व संख्येवर नियंत्रण ठेवणे अगत्याचे ठरत असल्याने संस्थान प्रशासनाने खालीलप्रमाणेनिर्णय घेतलेला आहे.श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था,शिर्डी येथे दर गुरुवारी,शनिवारी,रविवारी तसेच इतर सण व सुट्टयांचे दिवशी श्री साईबाबांचे दर्शनास भक्त गणांनी online.sai.org.in या संकेत स्थळावर जाऊन सशुल्क व निशुल्क दर्शनपास,आरती पास आरक्षित करूनच येणे
बंधनकारक आहे.आरक्षित पास असलेशिवाय दर्शन देणेसंस्था न प्रशासनास अशक्य आहे.सदर दिवशी गुरुवार,शनिवार/रविवार तथा सुट्टया व सणांचे दिवशी भक्तांची अलोट गर्दी होत असल्याने श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील पास वितरण केंद्रे गर्दी नियंत्रण करण्यासाठी बंद ठेवण्यात येतील.
शिर्डीत पायी पालख्यांचे प्रमाणही अभुतपूर्वरित्या वाढत आहे यास्त व समस्त पालखी मंडळांनी देखील शिर्डीत पालख्या आणण्याचे शत-प्रतिशत टाळावे. संस्थान प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.या आवाहनाचे तंतोतंत पालन करावे.कोविड-१९चे इतर निर्बंध जसेच्या तसे चालू राहतील.समस्त
साईभक्तांनी याची नोंद घेवून संस्थान प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी शेवटी केले आहे.