जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

“साईसमाधी शताब्दी हरीनाम सप्ताहा”चा इतिहास होणार जतन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

हडप्पा,मोहनजोदडो इतकेच काय जोर्वे सारख्या हजारो वर्षापुर्वीच्या शहरांची संस्कृती,इतिहास उत्खननातुनच जगासमोर आला.याच पुर्वापार धर्तीवर साईसमाधी शताब्दी वर्षातील हरीनाम सप्ताह व त्या निमीत्ताने गोदावरीच्या कुशीत असलेल्या सरला बेटावर उभारलेल्या वास्तुंची ऐतिहासिक माहिती कुपीच्या माध्यमातुन हजारो वर्षे जमीनीच्या पोटात जीवंत ठेवण्याचा अनोखा प्रयोग शिर्डीकर करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सगळ्या बाजुने पाण्याने वेढलेल्या या बेटावरील या वास्तुची व साईनगरीतील सप्ताहाची माहिती शेकडो वर्षांनीही जगाला उपलब्ध व्हावी,साईबाबा व गंगागिरी महाराजांच्या संतभेटीची स्मृती इतिहासाच्या कपाटात चिरंतर जतन व्हावी यासाठी आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

जवळपास दिडशे वर्षांपुर्वी सरला बेटाचे मठाधिपती गंगागिरी महाराजांनी शिर्डीकरांना साईबाबांच्या देवत्वाचा परिचय करून दिला.दोन वर्षापुर्वी साईचा समाधी शताब्दी सोहळा संपन्न झाला.या निमीत्ताने या दोन संताच्या भेटीला उजाळा देण्यासाठी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांच्या पुढाकारातुन शिर्डीत गंगागिरी महाराजांचा १७१ वा हरीनाम सप्ताह साजरा झाला आहे.यातुन जवळपास १ कोटी ६ लाख रक्कम शिल्लक राहीली.सप्ताहाची व गंगागिरी महाराज व साईबाबांच्या भेटीची स्मृती जतन करण्यासाठी या रकमेतून सरला बेटावर धर्मशाळा बांधण्यात आली आहे.येत्या २६ नोव्हेंबर रोजी वास्तुपुजन करून या वास्तुचा भक्तार्पण सोहळा संपन्न होत आहे.

यामध्ये चांदीच्या दोन डब्यामध्ये साईची विभुती व गुरूस्थानची माती, शिर्डीतील हरीनाम सप्ताहाचे चांदीचे नाणे (यावर एक बाजुने सप्ताहाचा लोगो तर दुसऱ्या बाजुने श्रीविठ्ठल,संत गंगागिरी,साईबाबा,नारायणगिरी व महंत रामगिरी यांच्या प्रतिमा), साईसमाधी शताब्दीचे चांदीचे नाणे,रौप्यपट (चांदीचा पत्र्यावर कोरलेला हरीनाम सप्ताहाचा कालावधी,जमा, खर्च याबद्दल माहिती),प्लास्टींग कोटींग मध्ये पॅक केलेला सप्ताहाचा अहवाल,या अहवालाची माहिती साठवलेला पेनड्राईव्ह,सप्ताहात वाजवण्यात येणारे पितळी टाळ,सध्या चलनात असलेली विविध नाणी अशा नवविधा भक्तीचे प्रतिक असलेल्या नऊ वस्तुंचा समावेश असेल. दरवर्षी साईमंदीरात पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपुजन करण्यात येते.यंदाच्या पुजनात या वस्तुंचाही समावेश करण्यात आला होता.यासाठी संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे,डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे,मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी पुढाकार घेतला.या नऊ वस्तु फायबर कोटींग केलेल्या एका चिनीमातीच्या बरणीत ठेवुन तीचे तोंड लाख लावुन सिल करण्यात येणार आहे.

येत्या २० नोव्हेंबर २०२० रोजी या कुपीची विधीवत पुजा करून तीला समाधी शताब्दी धर्मशाळेच्या परिसरातील जमीनीच्या पोटात सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. काही वर्षांनी उभारलेल्या या वास्तु नामशेष होतील, मात्र या कुपीच्या रूपाने शिर्डीकरांनी आयोजित केलेल्या हरीनाम सप्ताहाची व त्यातुन उभारलेल्या वास्तुची माहिती शेकडो-हजारो वर्षे जमीनीखाली सुरक्षीत राहील.कधीतरी उत्खननात ही कुपी जगासमोर येईल तेव्हा साईसमाधी शताब्दीतील हरीनाम सप्ताह,शिलकेतुन उभारलेली वास्तु आदींचा सप्रमाण उलगडा होईल.नुकताच अयोध्येतील राममंदीर उभारणीपुर्वी हीच पद्धत अवलंबण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close