धार्मिक
शिर्डीत येणार दादा महाराज गुरु !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीत अवधुत दादा गुरु यांचे शनिवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी ०८ वाजता शोभा यात्रेचे आयोजन तर त्यानंतर व सकाळी ०९ वाजता साई दर्शन संपन्न होणार असून सकाळी ११.वाजता साई चरित्र पारायण हॉल,साई आश्रम-१ (हजार रुम)शिर्डी येथे भाविकांचा सत्संग आयोजित केला असल्याची माहिती त्यांचे शिर्डी येथील महानयोगी अवधुत गुरु दादासाई फाऊंडेशनच्या वतीने सेवक मनोज वाघ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

दादा गुरु महाराज यांनी गेल्या काही वर्षांत अन्न ग्रहण न करता,फक्त नर्मदा जल ग्रहण करून राहतात,जे त्यांच्या सिद्धपुरूष असण्याचे लक्षण मानले जाते.त्यांनी नर्मदा नदीचे रक्षण आणि अध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले असल्याचे मानले जात आहे.ते शनिवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी ०८ वाजता श्री साईबाबांच्या शिर्डीत येत असून
त्यांचे आगामी ०८ एप्रिल रोजी त्यांच्या निराहार व्रताचे ०२ हजार दिवस होत असून या पावन पर्वावर ते शिर्डीत येत आहे.ही शिर्डी करांना पर्वणी मानली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,संत समर्थ दादा गुरु महाराज (मध्यप्रदेश) हे एक सिद्धपुरुष मानले जात असून ते सुमारे ५ वर्षांपासून निराहार राहून ४ लाख किलोमीटरहून अधिक पायी प्रवास करत आहेत.नर्मदा नदीचे संरक्षण आणि जागृतीसाठी त्यांनी कार्य केले आहे.त्यांची तपश्चर्या,अध्यात्मिक शक्ती आणि नर्मदा जल ग्रहण करून राहणे,यामुळे ते समाजमनात आदराचे स्थान बनले आहेत.

दादा गुरु महाराज यांनी गेल्या काही वर्षांत अन्न ग्रहण न करता,फक्त नर्मदा जल ग्रहण करून राहतात,जे त्यांच्या सिद्धपुरूष असण्याचे लक्षण मानले जाते.त्यांनी नर्मदा नदीचे रक्षण आणि अध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले असल्याचे मानले जात आहे.ते शनिवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी ०८ वाजता श्री साईबाबांच्या शिर्डीत येत असून
त्यांचे आगामी ०८ एप्रिल रोजी त्यांच्या निराहार व्रताचे ०२ हजार दिवस होत असून या पावन पर्वावर ते शिर्डीत येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.या धार्मिक व आध्यात्मिक सत्संगाचा शिर्डी,राहाता, कोपरगाव आणि नगर नाशिक जिल्ह्यातील भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डी येथील महानयोगी अवधुत गुरु दादासाई फाऊंडेशनच्या वतीने मनोज वाघ यांनी शेवटी केले आहे.