जाहिरात-9423439946
धार्मिक

देव,भक्ताचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतो-अमोल महाराज

न्यूजसेवा

संवत्सर -(शिवाजी गायकवाड)

  भगवंत हा भक्ताचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेत असतो तसेच तो समाजात उन्मत्त झालेल्या दृष्ट प्रवृत्तीचा संहार करण्यासाठी अवतरत असतो असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.अमोल महाराज बडाख यांनी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर,रामवाडी येथे बोलताना केले आहे.

“चैत्र शुद्ध नवमीला साजरा होणारा राम जन्मोत्सव (रामनवमी) हा भगवान विष्णूंचे सातवे अवतार ‘प्रभू श्रीरामचंद्र’ यांचा जन्मदिवस आहे.त्रेतायुगात अयोध्येत दुपारी १२ वाजता राजा दशरथ आणि कौसल्या यांच्या पोटी जन्मलेल्या रामाचा हा उत्सव,सत्य आणि नीतिमत्तेचा विजय म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात,पाळणा गाऊन व पूजा-अर्चा करून साजरा केला जातो” -ह.भ.प.अमोल महाराज बडाख.

  संपूर्ण भारतात रामनवमी विविध विधी आणि प्रथांसह साजरी केली जाते.यामध्ये उपवास,प्रार्थना,गायन,रामायणाचे पठण,मंदिरांना भेटी,मिरवणुका आणि संगीत किंवा नाट्य सादरीकरण यांसारख्या भक्तीपूर्ण प्रथांचा समावेश आहे.धर्मादाय कार्यक्रम आणि सामुदायिक भोजनाचे देखील आयोजन केले जाते.हा सण रामाच्या सद्गुणांवर चिंतन करण्याची एक संधी मानली जाते.या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात आणि संपूर्ण भारतातील असंख्य राम मंदिरांमध्ये महत्त्वाचे उत्सव साजरे केले जातात.अनेक ठिकाणी राम,सीता,लक्ष्मण आणि हनुमान यांच्या रथयात्रा निघतात.अयोध्येत,बरेच लोक पवित्र सरयू नदीत स्नान करतात आणि नंतर राम मंदिराला भेट देतात.हिच संधी साधून संवत्सर,रामवाडी ग्रामस्थ आणि आदींनी राम जयंती उत्सवाचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी त्यांनी आपल्या कीर्तन सेवेसाठी,” घेऊनिया चक्र गदा,हाचि धंदा करितो भक्तां राखे पायापाशी,दुर्जना ते संहारी” या सद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण केले आहे.

   सदर प्रसंगी शिवाजी महाराज ठाकरे,वाल्मीक महाराज जाधव,अरुण पगारे,भरत महाराज बारहाते,बबन आबक,हरीभाऊ मैंद,अण्णासाहेब शिंदे,रत्नाकर शिंदे,प्रभाकर आबक,राजेंद्र जगताप,अविनाश बोरनारे,दिनेश लोखंडे,रत्नाकर काळे,डॉ.स्वप्नील कासार,बाळासाहेब देहे,शिवाजी गायकवाड आदीसह संवत्सर,रामवाडी, लक्ष्मणवाडी,धोत्रे,भोजडे आदी परिसरातील भाविक भक्त,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  त्यावेळी पुढे  बोलताना ते म्हणाले की,”चैत्र शुद्ध नवमीला साजरा होणारा राम जन्मोत्सव (रामनवमी) हा भगवान विष्णूंचे सातवे अवतार ‘प्रभू श्रीरामचंद्र’ यांचा जन्मदिवस आहे.त्रेतायुगात अयोध्येत दुपारी १२ वाजता राजा दशरथ आणि कौसल्या यांच्या पोटी जन्मलेल्या रामाचा हा उत्सव,सत्य आणि नीतिमत्तेचा विजय म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात,पाळणा गाऊन व पूजा-अर्चा करून साजरा केला जातो.आता तर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याने प्रभू रामचंद्र हे ताडपत्रीतून थेट भव्य अशा मंदिरात प्रवेशकर्ते झाले आहे.असे सांगून आज पर्यंत जगाचा निर्माणकर्ता ताडपत्रीत का होता ? त्याला कोण आणि कोणता पक्ष आणि नेते जबाबदार होते यात आपल्याला जायचे नाही.पण आता हे चित्र बदलले आहे.त्यावेळी त्यांनी सामाजिक कुप्रथावर हल्ला चढवला असून तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केलं आहे.

या राम जयंती उत्सवात रामकृष्ण महाराज शिंदे,विजय महाराज गुंजाळ आदींचे कीर्तन संपन्न झाले आहे.कीर्तनानंतर उपस्थित भाविकान महा प्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close