धार्मिक
…या ठिकाणी श्रीमद् भागवत कथा !

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी स्व.कारभारी दगडु नेहे व हौशाबाई दगडू नेहे यांचे प्रथम पुण्य स्मरणार्थ शनेश्र्वर मैदानात भागवताचार्य श्री कैवल्य महाराज जोशी यांच्या सुश्राव्य वाणीतून उद्या गुरुवार दि.११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान रोजी सायंकाळी ०७ वाजता श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती आयोजक राजेंद्र दगडु नेहे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

अठरा पुराणांपैकी भागवत हे एक अतिशय महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पुराण मानले जाते.पुराणांच्या यादीत,भागवत आठवे पुराण म्हणून स्वीकारले जाते.भागवत पुराणात,महर्षी सूतजी त्यांच्यासमोर उपस्थित असलेल्या ऋषींना एक कथा सांगतात.ऋषी त्यांना विष्णूच्या विविध अवतारांबद्दल प्रश्न विचारतात.
श्रीमद्भागवत हे भारतीय साहित्याचे मुकुटरत्न आहे.भगवान शुकदेवांनी महाराज परीक्षितांना सांगितलेला भक्तीचा मार्ग एका पायरीसारखा आहे.यातील प्रत्येक श्लोकात श्रीकृष्णावरील प्रेमाचा सुगंध आहे.यात साधना-ज्ञान,सिद्ध-ज्ञान,साधना-भक्ती,सिद्ध-भक्ती,मर्यादा-र्ग,अनुग्रह-मार्ग,द्वैत,अद्वैत सन्मानासह विविध प्रेरणादायी उपाख्यानांचा अद्भुत संग्रह आहे.अठरा पुराणांपैकी भागवत हे एक अतिशय महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पुराण मानले जाते.पुराणांच्या यादीत,भागवत आठवे पुराण म्हणून स्वीकारले जाते.भागवत पुराणात,महर्षी सूतजी त्यांच्यासमोर उपस्थित असलेल्या ऋषींना एक कथा सांगतात.ऋषी त्यांना विष्णूच्या विविध अवतारांबद्दल प्रश्न विचारतात.सूतजी म्हणतात की त्यांनी ही कथा दुसऱ्या ऋषी शुकदेवांकडून ऐकली होती.त्यात एकूण बारा अध्याय आहेत.या पुराणाचा भारतीय जनमानसावर मोठा पगडा आहे.परिणामी यांचे गावोगाव आयोजन केले जाते.संवत्सर येथेही राजेंद्र नेहे आणि त्यांच्या परिवाराकडून याचे आयोजन केले आहे.

दरम्यान याचा शुभारंभ श्री क्षेत्र कुंभारी येथील श्री राघवानंदगिरी यांचे शुभहस्ते संपन्न होत आहे.तर गुरुवार दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी शिऊर येथील भागवताचार्य मधुसूदन महराज मोगल काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी संवत्सर आणि परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजेंद्र नेहे,शंकर कारभारी नेहे वैभव नेहे,सुनील नेहे,सागर नेहे,सूरज नेहे आदींनी केले आहे.