जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…येथील हरिनाम सप्ताहाची सांगता

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर- (प्रतिनिधी)

  कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील अखंड हरिनाम सप्ताहाची नुकतीच दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात सांगता झाली. बोलकी येथील ह.भ.प.भानुदास महाराज बोलकीकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर आमटी भाकरीच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.भजन, किर्तन, श्रीकृष्ण चरित्र आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी गेले सात दिवस संवत्सरगांव गजबजून गेले होते.

“उत्तम जीवन जगणारी माणसे स‌द्विचारी असतात तर जीवनमूल्ये हरवून बसणारी माणसे मात्र जगण्याची व्यर्थ धडपड करीत असतात.सद्याच्या धावपळीच्या युगात परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालला असून अहंभाव मात्र फोफावत चालला असल्याची वर्तमानातील खंत आहे”- ह.भ.प.भानुदास महाराज.बोलकीकर.

  प. पू. वै.रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्व.नामदेवराव परजणे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळापासून संवत्सरगांवात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.त्यात ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, उपसरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचनाताई ढेपले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा हा सोहळा पार पडला.

  काल्याच्या किर्तनातून ह.भ.प.भानुदास महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,विश्वातले सर्व ज्ञान हे माणसासाठी आहे. परंतु या ज्ञानापासून माणूस वंचित आहे. चांगली जीवनमूल्ये,चांगली गुणधर्मे,चांगले विचार यापासून माणूस दूर जाताना दिसतो. त्यामुळे मानवी जीवन हे दैवी जीवन वनण्याऐवजी आसुरी जीवन बनत चालले आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात आले पाहिजे. उत्तम जीवन जगणारी माणसे स‌द्विचारी असतात तर जीवनमूल्ये हरवून बसणारी माणसे मात्र जगण्याची व्यर्थ धडपड करीत असतात.सद्याच्या धावपळीच्या युगात परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालला असून अहंभाव मात्र फोफावत चालला असल्याची खंत व्यक्त करुन भानुदास महाराज यांनी स्व.नामदेवराव परजणे यांच्या आदर्श जीवनाविषयी माहिती दिली. स्व.नामदेवराव परजणे यांनी संवत्सर गावासाठी हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जतन करुन ठेवलेली आहे.तीच परंपरा त्यांचे चिरंजीव राजेश परजणे यांनी पुढे चालू ठेवली आहे ही खरोखरच कोतुकाची बाब आहे.त्यांच्या  सामाजिक कार्याचा मोठा वारसा परजणे आण्णांनी घालवून दिलेला आहे.तो सर्वांनीच पुढे चालू ठेवावा असेही मार्गदर्शन प. पू. भानुदास महाराज यांनी यावेळी केले.

गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले की,वैकुंठवासी प.पूज्य रामदासी महाराज व आदरणीय नामदेवरावजी परजणे यांनी सुरु केलेल्या हरिनाम सप्ताहाच्या नियोजनासाठी व हा सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी जे परिश्रम घेतले ते निश्चितच कौतुकास्पद आहे.कोणताही जातीभेद किंवा राजकीय विचार मनात न आणता सर्वजण एकत्र येऊन सप्ताह पार पाडतात ही संवत्सरची खरी संस्कृती आहे. ती भविष्यातही अशीच सुरु राहील असे सांगून श्री राजेश परजणे पाटील यांनी ग्रामस्थांचे तसे भजनी मंडळांचे व्यक्त केले.

सप्ताह कालावधीत संवत्सरसह कोकमठाण, सडे, वारी, कान्हेगांव, धोत्रे, भोजडे, खोपडी, दहेगावबोलका, लौकी, तळेगांवमळे, घोयेगांव, उक्कडगांव, कासली, शिरसगांव, तिळवणी, पढेगांव आदी गांवातील भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.. संवत्सर परिसरातील रामवाडी, लक्ष्मणवाडी, दशरथवाडी, बिरोवा चौक या ठिकाणच्या भजनी मंडळांनी रात्रंदिवस पहारा दिला. सांगता समारंभावेळी उपसरपंच विवेक परजणे, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, खंडू फेपाळे, फकिरराव बोरनारे, ह. भ. प. वाल्मिक महाराज जाधव, भरतराव बोरनारे, दिलीपराव ढेपले, लक्ष्मणराव परजणे, चंद्रकांत लोखंडे, शिवाजीराव गायकवाड, सोमनाथ निरगुडे, ज्ञानदेव कासार, अनिल आचारी, दिलीप तिरमखे, काका गायकवाड, बापू गायकवाड, सुभाष लोखंडे, निवृत्ती लोखंडे, लक्ष्मणराव शेटे, प्रभाकर आबक, बाळासाहेब गायकवाड, रमेश गायकवाड, पोपटराव कर्पे, बाळासाहेव दहे, अविनाश गायकवाड, रंगनाथ निरगुडे, भाऊसाहेब कासार, नामदेवराव पावडे, भिकन कर्पे, हबीब तांबोळी, गोकूळ गंगुले, सुभाष बिडवे, अविनाश बोरनारे, गोरखनाथ सोळसे, भाऊसाहेव ढेपले, मोहन ढेपले यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेश आबा परजणे फौन्डेशन व मित्रमंडळाच्या सदस्यांसह नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय, जनता हायस्कूल, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थीनींनी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close