धार्मिक
…या महंतांच्या हस्ते शिव महापुराण कथेचे ध्वजारोहण

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील भाविक भक्तासाठी प्रत्येक पाडव्याला पर्वणी असलेल्या श्री साई गाव पालखी सोहळा आणि मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या
‘श्री शिवमहापुराण कथा’ या सोहळ्याचे ध्वजारोहण श्री क्षेत्र कोपरगाव बेटाचे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते मंगळवार दि.२५ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता तहसील कचेरी मैदान (संत ज्ञानेश्वर नगरी) या ठिकाणी संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.कथेचे हे ३१ वें वर्षे आहे.

शिव पुराण भगवान शंकर आणि त्यांचा अवताराशी निगडित आहे.त्यात शिव भक्ती,शिव महिमा आणि शिवाचे संपूर्ण जीवन चरित्र वर्णिले आहे.त्याच बरोबर ज्ञान,मोक्ष, उपास,तप,जप यांचा मिळणाऱ्या फळांचे देखील वर्णन आढळतं.शिव पुराणामध्ये सहस्त्र ज्ञानवर्धक आणि भक्ती विषयक लिहिले आहे.या कथा श्रावणाचे माणसाला मुक्ती मिळते असा भाविकांची श्रद्धा आहे.
शिव पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत,ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे.तुम्ही शुभ मुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता.पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे. चंचला आणि तिचा पती बिंदुगा यांची कथा शिवपुराणात आढळते,ज्यांना शिवपुराण ऐकून शिवलोकात स्थान मिळाले.शिवपुराणाच्या महत्त्वाचे वर्णनही याच कथांमध्ये आढळते.त्यासाठी पंढरपूर येथील साध्वी अनुराधाताई यांचे मुखातून ही कथा शहरातील भाविकांना प्रथमच ऐकायला मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदर कथा सायंकाळी ०७ ते रात्री १० या वेळेत ऐकायला मिळणार आहे.त्यासाठी कोपरगाव तहसील मैदान ज्ञानेश्वरनगरी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे.गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि महाराष्ट्रात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी घराच्या दारावर गुढी उभारली जाते आणि मराठी नव वर्षाची सुरुवात आनंदाने केली जाते.सदर कथा याच दिवशी सुरू होत असल्याने त्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.कथेसाठी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील भविकभक्तानी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.