धार्मिक
संगीता हांडोरे यांनी घेतले साई दर्शन

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आज शिर्डी येथे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा खा.चंद्रकांत हांडोरे यांच्या पत्नी मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता हांडोरे व त्यांच्या कन्या दक्षिण मध्य मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रज्योती हांडोरे यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले आहे.

यावेळी श्री.साईबाबा संस्थान जनसंपर्क विभाग यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र संघटक शिमोन जगताप,राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब साठे,उपजिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड,श्री.सरोदे,शिर्डी परिसरातील दशरथ गुजर,दिपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.