जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या शहरात राम कथा उत्साहात सुरू

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या कर्मवीरनगर येथे साई अष्टविनायक तरुण मंडळाच्या वतीने श्री साईबाबा मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्वामी रमेशगिरिजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय श्री राम कथेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक नारायण कुमावत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

  

“रामकथेचे महत्त्व म्हणजे,राम हे शौर्य,सद्गुण,तर्कशक्ती आणि योग्य काम करण्याचे प्रतीक आहेत.प्रभू राम हे भाऊ,पती,मित्र आणि राजा या सर्व भूमिकांमध्ये अनुकरणीय आहेत.राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत.राम हे सर्वात लोकप्रिय हिंदू देवतांपैकी एक आहेत.राम हेआत्मा-ज्योती आहेत’- महंत रमेशगिरीजी महाराज.

  भगवान राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत व भगवान नारायणांचे सातवे अवतार मानले जातात.वाल्मिकिींनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे ते नायक आहेत.श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते.ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते.राम हा भगवान विष्णूचा अवतार आहे आणि त्याला श्री राम आणि श्री रामचंद्र या नावांनीही ओळखले जाते.रामकथेचे महत्त्व म्हणजे,राम हे शौर्य,सद्गुण,तर्कशक्ती आणि योग्य काम करण्याचे प्रतीक आहेत.प्रभू राम हे भाऊ,पती,मित्र आणि राजा या सर्व भूमिकांमध्ये अनुकरणीय आहेत.राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत.राम हे सर्वात लोकप्रिय हिंदू देवतांपैकी एक आहेत.राम हेआत्मा-ज्योती आहेत.म्हणजेच,आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे.राम हे भाऊ,पती,मित्र आणि राजा या सर्व भूमिकांमध्ये अनुकरणीय आहेत.राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत.राम हे तर्कशक्ती आणि योग्य काम करण्याचे प्रतीक आहेत.राम हे शौर्य आणि सद्गुणांचे प्रतिनिधित्व करणारे मानले जाते.राम हे एक भाऊ,एक पती,एक मित्र आणि एक राजा या अशा सर्व भुमिकांमध्ये अनुकरणीय आहेत.राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत.त्यातच मागील वर्षी २२ जानेवारी रोजी राम मंदिराची आयोध्येत उभारणी झाल्याने राम कथेला मोठी उंची वाढली आहे.राम मंदिराच्या दर्शनाला रोज पाच लाख लोक दर्शन घेत आहे.त्यामुळे देशभरात राम कथा मोठ्या उत्साहात सांगितले जात असून समाजातील विविध दोष नष्ट करण्यासाठी ती अनुकरणीय मानली जात आहे.


   रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो.प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील मराठी संत एकनाथ,हिंदी भाषा कवी तुलसीदास,इ.स.च्या १३व्या शतकातील तामिळ कवी कंब,इ.स.च्या २० व्या शतकातील मराठी कवी गजानन दिगंबर माडगूळकर आदी प्रमुख मानले जातात.

   कोपरगाव येथील कर्मवीरनगर येथील साई अष्टविनायक तरुण मंडळाच्या वतीने श्री साईबाबा मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्वामी रमेशगिरिजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीत मय श्री राम कथेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे.त्याला  कर्मवीरनगर आणि कोपरगाव शहरातून मोठा प्रतिसाद लाभत आहे.त्यासाठी कर्मवीर नगर येथील महिलांसह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

   सदर कथा ही दिनांक २६ फेब्रुवारी पर्यंत रोज सायंकाळी ०७ ते रात्री १० या वेळेत चालणार असून दि.२७ फेब्रुवारी रोजी केल्याचे कीर्तन सायंकाळी ०७ वाजता संपन्न होणार आहे.त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती या मंडळाचे संस्थापक नारायण कुमावत यांनी शेवटी दिली आहे.सदर कथेस महिला आणि भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close