धार्मिक
…या ठिकाणी स्वामी समर्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
न्यूजसेवा
संगमनेर-(प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ मठ कऱ्हे घाट नांदुर शिंगोटे येथे दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा त्यानिमित्ताने अखंड नाम जप यज्ञ याग व सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित केला आहे अशी माहिती मठाधिपती प्रदीप दादा सोनवणे यांनी दिली आहे.
दत्त जयंती पावन पर्व काळात ०८ डिसेंबर ते १६ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार असून १२ डिसेंबरला महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांचे हस्ते भव्य स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला असून १० डिसेंबर रोजी या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.या निमित्ताने मूर्ती वर विविध संस्कार होणार आहे.१५ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त पालखी सोहळा होणार आहे.
प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे.त्यामध्ये ०८ ला बालकीर्तनकार समर्थ महाराज ठाकरे,०९ ला समाज प्रबोधनकार पल्लवी ताई वाकचौरे,१०ला पुजाताई कानवडे,११ला जयश्रीताई गावंडे नाशिक,१२ ला गायनाचार्य सुनील महाराज मंगळापूरकर,१३ला शिवशाहीर शरद ढवळे,१४ला अनंत महाराज काळे,१५ ला किशोर महाराज खरात यांचे तर १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता संजय महाराज वेळूकर सातारा यांचे काल्याचे कीर्तन होईल.
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ मठ कऱ्हे घाट नांदूर शिंगोटे,पळसखेडे रोड चे सेवेकरी,निमोण,पळसखेडे भजनी मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे.