जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगाव तालुक्यात ऋषीपंचमीनिमित्त कीर्तन

न्युजसेवा

संवत्सर (वार्ताहर)

सालाबादप्रमाणे यावर्षीही कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे ऋषीपंचमी निमित्ताने ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम रविवार दि.८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता श्री शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

  

गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या संवत्सरमध्ये रामायण काळातील थोर महर्षि शृंगऋर्षीचे वास्तव्य होते.त्यांचे मोठे मंदीर या ठिकाणी आहे.या शृंगऋषींना राजा दशरथाने श्री रामाच्या जन्माच्या अगोदर पुत्र कामेष्ठी यज्ञासाठी या ठिकाणाहून नेलेले होते.म्हणून या ठिकाणाला अनन्य साधारण महत्व आहे.

  संवत्सर हे गांव रामायण काळातील दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो.गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या संवत्सरमध्ये रामायण काळातील थोर महर्षि शृंगऋर्षीचे वास्तव्य होते.त्यांचे मोठे मंदीर या ठिकाणी आहे.या शृंगऋषींना राजा दशरथाने श्री रामाच्या जन्माच्या अगोदर पुत्र कामेष्ठी यज्ञासाठी या ठिकाणाहून नेलेले होते.म्हणून या ठिकाणाला अनन्य साधारण महत्व आहे.ऋषीपंचमी निमित्ताने या मंदिराजवळील घाटावर महिला मोठ्या संख्येने स्नानाची पर्वणी साधतात.या दिवशी भावीक महिला उपवास धरतात.या उपवासासाठी फक्त म्हसीच्या दुधाचाच चहा महिला घेतात व हा उपवास मध्यरात्री सोडतात.

   ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सर येथे प.पू.रामदासी महाराज यांच्या प्रेरणेणे स्व.नामदेवराव परजणे यांनी दरवर्षी किर्तनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून त्यादृष्टीने आयोजन केलेले होते.ती परंपरा आजतागायत चालू आहे. ह.भ.प.मिराबाई मिरीकर यांनी दरवर्षी संवत्सरला येवून किर्तन करण्याचे वचन दिलेले आहे.त्यानुसार त्या दरवर्षी ऋषिपंचामीला संवत्सरला येऊन आपली किर्तन सेवा सादर करीत असतात.यावेळी महिला वर्ग व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा गोदावरी नदीला पाणी असल्याने स्नानासाठी महिलांची मोठी गर्दी होणार आहे.महिला व भावीकांनी मिराबाई मिरीकर यांच्या किर्तनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close