जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

  …या ठिकाणाहून श्री क्षेत्र पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथील रोकडेश्वर महाराज मंदिर ते श्री क्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगाच्या दर्शनासाठी या दरम्यान नुकतीच पायी दिंडीचे आयोजन केले असल्याची माहिती ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या दिंडीचे विविध ठिकाणी भाविकांनी स्वागत केले आहे.राहुरी येथे अरुण तनपुरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या दिंडीचे जोरदार स्वागत केले आहे.

   

‘पंढरीचा वास,चंद्रभागेस्नान,आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.या वाऱ्या दर आषाढीला आवर्जून राज्यभरातून जात असतात वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथूनही दर वर्षी हि दिंडी ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली जात असते.

  संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही.तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे.एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय.जो नियमित वारी करतो तो वारकरी.वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.’पंढरीचा वास,चंद्रभागेस्नान,आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.या वाऱ्या दर आषाढीला आवर्जून राज्यभरातून जात असतात वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथूनही दर वर्षी हि दिंडी ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली जात असून हे दिंडीचे पहिलेच वर्ष आहे.यावर्षी हि दिंडी गुरुवार दि.०४ जून रोजी सकाळी १० वाजता रोकडेश्वर मंदिरातून प्रस्थान झाले आहे.

राहुरी येथे अरुण तनपुरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या दिंडीचे जोरदार स्वागत केले असून ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचा सत्कार केला आहे.

  सदर दिंडीचा पहिला मुक्काम गोंडेगाव येथे राहणार असून दुसरा मुक्काम देवळाली येथे तर तिसरा मुक्काम धमोरी नांदगाव गुरुनानक हॉटेल शेजारी संपन्न झाला आहे.चौथा मुक्काम हा वडगाव गुप्ता येथे,तर पंचम मुक्काम दहिगाव साकत येथे होता.तर सहावा मुक्काम थेरगाव येथे सातवा मुक्काम डाकू निमगाव,आठवा मुक्काम एस.डी.कॉलनी करमाळा या ठिकाणी तर नववा मुक्काम हा मौजे पांगरे या ठिकाणी राहणार आहे.दहावा मुक्काम हा मौजे-तांबवे ता.माढा येथे राहणार आहे.अकरावा मुक्काम हा भोसे या ठिकाणी राहणार आहे.बारावा मुक्काम हा पंढरपूर या ठिकाणी राहणार आहे.

अखेर विसाव्याचे ठिकाण हे पंढरपूर येथे महादेव परचंडकर,चिंचोली गेट समोर ट्रॅक्टर शोरूम समोर,टेंभुर्णी रोड अहिल्या चौक येथे राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.दि.१७ जूलै रोजी सायंकाळी ०६ वाजता संजय महाराज जगताप यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तर १८ जूलै रोजी सकाळी ०९ वाजता त्यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.या दिंडीत समाविष्ट होणाऱ्या वारकऱ्यांनी आपली नावे मो.क्रं.८९७५२४०६७७,८०१००८९१३८ आदींवर नोंदवून दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन शेवटी संजय महाराज यांनी केले आहे.या दिंडीस मोठा प्रतिसाद लाभला असल्याची माहिती संजय महाराज जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

   दरम्यान राहुरी येथे अरुण तनपुरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या दिंडीचे जोरदार स्वागत केले असून ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close