धार्मिक
…या देवस्थानचे वतीने गंगा-दशहरा उत्सव साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने दरवर्षी प्रमाणे गंगा दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके शुभहस्ते श्री गणेश पुजन,गंगा माता अभिषेक,पुजा करण्यात आली.तसेच गंगामातेला साडी-चोळी,बांगडी, मंगळसुत्र,जोडवे यासह ओटीचे सर्व साहित्यांने ओटी भरुन आंबा आणि फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.सोमेश्वर महादेव शिवलिंगावर काशी-गंगोत्री,गोदावरी जल अभिषेक,रुद्र पठण,पुजा आणि आरती करण्यात आली.तसेच आंबा,केळी,बेल आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.या प्रसंगी व्यवस्थापन समितीचे नारायण अग्रवाल,जयंत विसपुते,पौरोहित्य प्रदिप पदे,प्रशांत जंगम,नंदू गुरव,भरत संचेती सह भाविक उपस्थित होते.
जेष्ठ शुध्द दशमीला हस्त नक्षत्रात गंगा पृथ्वीवर अवतरली.तीचा उगम स्थानापासून प्रवाहीत मार्गावरील भूतलावरच्या जीवसृष्टीचे कल्याण झाले आहे.गंगेच्या अवतरण्याची पौराणिक महत्त्व आहे.भगवान राम यांचे पुर्वज राजा सगर यांनी अश्वमेध यज्ञ केला.या यज्ञातील घोडा राजा इंद्राने चोरुन कपिल मुनी यांचे पाताळातील आश्रमात बांधला.या वेळी कपिल मुनी तपस्येत होते.राजा सगर व त्यांच्या पुत्रांनी घोड्याचा शोध घेतांना कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले.तेव्हा तेथे बांधलेला घोडा पाहून कपिल मुनींनी आपला घोडा चोरला या भावनेतून राजा व त्याचा पुत्रांनी त्यांचेवर आक्रमण केले.मुनींच्या तपस्येत भंग झाला.मुनींनी डोळे उघडताच आक्रमण केलेल्यांना राजाच्या पुत्रांना भस्म करण्यास सुरुवात केली.यातून राजा सगर व पुत्र अंशुमान आपला बचाव करत मुनींना शरण गेले.मुनींची क्षमा मागितली.मुनींच्या प्रकोपाने मृतांना मुक्ती आणि शांती मागितली.तेव्हा कपिल मुनींनी त्यांचेवर “गंगाजल” शिंपडून मुक्ती देता येईल असे सांगितले.
राजा सगर यांचा पुत्र अंशुमान आणि अंशुमानचा पुत्र राजा दिलीप यांनी तपस्या करून देवी गंगेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला.या सर्वांनी प्रयत्नात असफल होवून शेवटी प्राण सोडले.राजा दिलीप यांचा पुत्र राजा भागिरथ यांचे घोर तपस्येला ब्रम्हदेव प्रसन्न झाले.त्यांनी ब्रम्हदेवाला गंगा मातेला भूतलावर पाठविण्याचे वरदान मागितले.तेव्हा ब्रम्हदेवाने गंगेच्या प्रलयाचा भार आणि वेग सांभाळण्याची शक्ती फक्त शिवशंकरात असल्याचे सांगितले…तेव्हा भागिरथाने शिवाची कठिण तपस्या करुन त्यांनाही प्रसन्न केले…
ब्रम्हदेवाच्या कमंडलूतून स्वर्गातून गंगा भूतलावर अवतरली.भगवान शिवशंकराने वेगाने आलेल्या गंगेला आपल्या जटांमध्ये सामावून घेतले.अशा प्रकारे “गंगा” स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली.गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो.गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा.जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते.अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात.आपल्या मृत पूर्वजांना (सगरांच्या पुत्रांना) मुक्ती मिळवून देण्यासाठी भगीरथाने महत्प्रयासाने गंगेला पृथ्वीवर आणले.असे आजही मानले जाते.त्यामुळे पराकाष्ठेच्या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न म्हणतात.गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे.गंगेची लांबी २,५२५ कि.मी.आहे.हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे.तिला माता म्हटले गेले आहे.गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे.भारतातील कनोज,कोलकत्ता,कांपिल्य, काशी,कौशांबी,पाटलीपुत्र(पाटणा),प्रयाग,बेहरामपूर,मुंगेर,मुर्शिदाबाद इत्यादी प्राचीन,ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.
भारतीय परंपरेत मानवाच्या मुक्तीसाठी “गंगाजल” दिले जाते.भारत सरकारचे टपाल विभागामार्फत गंगोत्री (काशी)चे “गंगाजल” सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
याच गंगा मातेची थोरली बहीण म्हणजे गोदावरी गोहत्येचा पातकातून मुक्ती देणारी पापक्षालन करणारी नदी.गोदावरी कोपरगाव येथून वाहते.या स्थानाला दक्षिण काशी म्हणून विशेष महत्त्व आहे.या मुळे येथे राजे-महाराजे,पेशवा,संत-महंत यांचे वाडे,मठ,आश्रम गोदातटावर दिसतात.
श्रीमंत महामहीम पवार सरकार यांनी हे महत्व जाणून घेत सोमेश्वर महादेव महादेव देवस्थानचे सभामंडपात उजव्या बाजूला श्री गणेश आणि डाव्या बाजूला गंगा माता मुर्तीची स्थापना केली आहे.
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे महादेव देवस्थानचे वतीने वार्षिक सण-उत्सव साजरे करण्यात येतात. सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने गंगा दशहरा उत्सव साजरा करण्यात आला आहे.