धार्मिक
…या ठिकाणी जालिंदरनाथांची यात्रा होणार संपन्न
न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर लक्ष्मणवाडी येथील सालाबादा प्रमाणे संपन्न होणारी श्री जालिंदरनाथ (जंगलीबाबा) यात्रा या वर्षी शनिवार दि.३० मार्च पासून प्रारंभ होत असून या दिवशी भव्य मिरवणूक संपन्न होणार असून रविवार दि.३१ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जाहीर हरी किर्तन संपन्न होणार असल्याची माहिती यात्रा समितीने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे.”नाथ” या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला “नाथ संप्रदाय” असे नाव मिळाले असे सांगण्यात येते.या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर “नाथ” हा शब्द जोडता येतो.
नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली आणि गोरक्षनाथ ऊर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला.नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सुमारे ८व्या ते १२वे शतकात) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला अशी ह्यांच्या अनुयायांची समजूत आहे.योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे हे ह्या पंथाचे ध्येय होय.नवव्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारूपाला आणले.या नाथ संप्रदायाची अनेक ठिकाणे महाराष्ट्रात प्रसिद्ध असून यातील एक ठिकाण संवत्सर येथील लक्ष्मणवाडी (दहिगाव बोलका) येथे प्रसिद्ध आहे.या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भाविक भक्त मोठ्या उत्साहात भरवत असतात.
दरम्यान या ठिकाणी सालाबादप्रमाणे दर वर्षी मोठा यात्रा उत्सव संपन्न होत असतो.या वर्षी शनिवार दि.३० मार्च पासून प्रारंभ होत असून या दिवशी सायंकाळी ०६ वाजता भव्य मिरवणूक भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून दुसऱ्या दिवशी रविवार दि.३१ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जाहीर हरी किर्तन संपन्न होणार असून उपस्थितीत भाविकांना महा प्रसादाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती यात्रा समितीने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या उत्सवाचा संवत्सर,लक्ष्मण वाडी,दहिगाव बोलका,कासली,पढेगाव आदी ठिकाणच्या भाविकांनी घ्यावा असे आवाहन यात्रा समितीने आमचे प्रतींनिधी शिवाजी गायकवाड यांचेशी बोलताना केले आहे.