जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

महाशिवरात्रीनिमित्त…या महाराजांचे किर्तन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

संवत्सर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि.०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.शिवाजी महाराज भालूरकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम शृंगेशवर महाराज मंदिराच्या प्रांगणात सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे.


दरम्यान याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता मंदिरापासून ते पालखी मार्गाने श्री शृंगेश्वर महाराजांची पालखीची मिरवणूक निघणार आहे.या सर्व धर्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.

पुरातन काळात राजा दशरथाने श्रीरामाच्या जन्माच्यावेळी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ज्या शृंगऋषीना पाचारण केले होते त्या शृंगऋषींचे भव्य मंदीर संवत्सरला गोदावरी काठावर आहे. याशिवाय महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदीरही गोदावरी काठावर असल्याने या स्थानाला विशेष महत्व आहे.

महाशिवरात्री निमित्त श्री शुंगेश्वर महाराज मंदिराच्या परिसरातील पटांगणामध्ये वेगवेगळे व्यावसायिक व फळ भाजीपाला विक्रेते, शेतकरी व व्यापाऱ्यांच्या दुकाना थाटल्या जाणार आहेत.त्यात विविध खेळणी, मिठाई, प्रसाद, कपडे अशा दुकानांचा सहभाग असणार आहे.यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी विचारात घेऊन संवत्सर ग्रामपंचायतीमार्फत चांगले नियोजन करण्यात आलेले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.याशिवाय शिर्डी येथील गाईवाले मित्रमंडळाचे संतोष वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत साबुदाना खिचडीचा महाप्रसाद भाविकांसाठी ठेवण्यात आलेला आहे.

संवत्सर या गांवाला पौराणिक व धार्मिक महत्व असल्याने महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक पुरुष -महिला व बालगोपालांच्या गर्दीने गोदाकाठाला अक्षरशः पंढरपुराचे स्वरुप येते. पुरातन काळात राजा दशरथाने श्रीरामाच्या जन्माच्यावेळी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ज्या शृंगऋषीना पाचारण केले होते त्या शृंगऋषींचे भव्य मंदीर संवत्सरला गोदावरी काठावर आहे. याशिवाय महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदीरही गोदावरी काठावर आहे. पलिकडच्या तिरावर कोकमठाण परिसरात पुरातन महादेवाचे हेमाडपंथी मंदीर देखील आहे. अशा धार्मिक स्थळांमुळे संवत्सरला आगळे वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे. दरवर्षी महाशिवरात्र आणि ऋषीपंचमी हे उत्सव गोदावरी काठावर श्री शृंगेशराच्या मंदिराजवळ मोठ्या उत्साहाने सारे केले जातात. या वर्षी देखील शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार असून भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनही संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close