जाहिरात-9423439946
धार्मिक

…या दिंडीचे आळंदीसाठी दिंडीचे प्रस्थान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   श्री क्षेत्र भऊर येथून श्री क्षेत्र आळंदीसाठी नुकतेच ह.भ.प.संजय महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच दिंडीने प्रस्थान केलं आहे.त्यांचे गावोगावच्या भाविकांनी स्वागत केले आहे.

‘अलका माहात्म्य’ नावाचे दुसरे हस्तलिखितही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहे.यामध्ये ४६ पाने असून संतकवी बालमुकुंद केसरी या ग्रंथाचे लेखक आहेत.एकूण श्लोकसंख्या १३३ असून यामध्ये आळंदीचा उल्लेख आनंदवन-अलकावति-अलका या नावाने आहे.तर,इंद्रायणी नदीचा ‘कौबेरास्य महानदी’ म्हणजे कुबेरगंगा असा उल्लेख आहे.


  संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला.या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात.देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे.वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे.संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२९६ साली जिवंत समाधी घेतली.त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७० मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते.आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते.या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ कि.मी.अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.तर कार्तिक वारीसाठी श्री क्षेत्र भऊर येथून हि दिंडी निघून ती शनिवार दि.०९ डिसेंबर रोजी आळंदीत पोहचणार आहे.

  

सदर दिंडी दररोजच्या मार्गक्रमणात,पहाटे ३ वाजता उठून,शुचिर्भूत होउन अंघोळ,चहा,नास्ता झाल्यावर मग मार्गक्रमणाला सुरुवात होते.यात महिलाही सहभागी असतात.त्यांचे डोक्यावर बहुधा तुळशी वृंदावन असते.मार्गात वारकरी फुगड्यादेखील खेळतात.दिंडीतले वारकरी रोज सुमारे २५ किलोमीटरचे अंतर चालतात.दिंडीचा मुक्काम रस्त्यातील एखाद्या गावात असतो.तेथे त्या गावातील कुटुंबे या वारकऱ्यांच्या चहा नास्ता व जेवणाची सोय करतात. वारकऱ्यांची सोय करणे म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा करणे असा समज प्रचलित आहे.वारीत गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव नसतो.वारी केल्याने अहंकार गळून पडतो असा भाविकांत समज आहे.

   दरम्यान सदर दिंडीचा मुक्काम जालिंदर तुरकणे,पिंपळवाडी,ता.राहाता,चंद्रभान वदक,निमगाव जाळी ता.संगमनेर,बाळासाहेब पाबळ,पानोडी,सागर पहिलवान,बेरेवाडी,भाऊसाहेब लेंढे,खंदरमाळ,सुभाष वाघाळे,आळेफाटा,ता.जुन्नर,मारुती चौधरी,नारायणगाव,ता.जुन्नर,वाकेश्वर देवस्थान ट्रस्ट पेठ,अड्,नवनाथ कड,वाकी बुद्रुक ता.राजगुरूनगर,श्री गजानन महाराज,चाकण,नवनाथ जगताप,शंकरराव काळे आदी ठिकाणी मुक्काम होणार आहे.आळंदीत न्यू पेठकर धर्मशाळा इंद्रायनी गार्डन आळंदी देवाची या ठिकाणी शेवटचा मुक्काम होणार असल्याची माहिती ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close