धार्मिक
…या तालुक्यात १.३५ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील १.३५ कोटीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“कोपरगाव तालुक्यात तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत कान्हेगाव येथील नृसिंह देवस्थान परिसर सुशोभिकरण-२० लक्ष,वारी येथील रामेश्वर देवस्थान परिसर सुशोभिकरण करण-१५ लक्ष असे एकूण ३५ लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव मतदार संघातील अनेक देवस्थानांच्या ठिकाणी वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते.परंतु या देवस्थानांचा या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी अपेक्षित विकास केला नसल्यामुळे भाविकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा मिळत नव्हत्या.त्याबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून मतदार संघातील अनेक देवस्थानांचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करून या देवस्थानांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळविण्यात यश मिळाले आहे.
दरम्यान या निधीतून तातडीने कामे सुरु होवून भाविकांना लवकरात सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्यातून तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मतदार संघातील कान्हेगाव येथील नृसिंह देवस्थान परिसर सुशोभिकरण करणे (२० लक्ष) व वारी येथील रामेश्वर देवस्थान परिसर सुशोभिकरण करणे (१५ लक्ष) एकूण ३५ लाखाच्या कामास तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
तसेच जन सुविधा योजने अंतर्गतअनेक ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठीसाठी देखील मोठा निधी मंजूर करून आणला असून या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन ईमारतीसाठी ५० लक्ष रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
यात शहाजापूर ग्रामपंचायत कार्यालय (२० लक्ष),कोळगाव थडी ग्रामपंचायत कार्यालय (१५ लक्ष), जेऊर कुंभारी ग्रामपंचायत कार्यालय (१५ लक्ष) तसेच डाऊच बु.येथील स्मशानभूमी विकास करण्यासाठीच्या कामास (१० लक्ष),तसेच सुरेगाव,कोळपेवाडी,कोकमठाण,रवंदे या चार ग्रामपंचायतींना गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रत्येकी १० लक्ष याप्रमाणे ४० लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.लवकरच या विकास कामांना प्रारंभ होवून नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर होवून सुविधा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.