विविध पक्ष आणि संघटना
एकनाथ शिंदे हे सामान्यांना आपले वाटणारे मुख्यमंत्री-खा.लोखंडे

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून हा बदल होताच प्रशासनातही मोठा बदल होऊन शासनाच्या कामाला गती मिळाली असल्याचा दावा शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांनी केला आहे.
“मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रशासनातील प्रदिर्घ अनुभवामुळे त्यांची सर्व स्तरातील अधिकाऱ्यावर पकड आहे.त्यामुळे राज्यकारभार गतीने हाकला जात आहे.राज्य सरकारचा कारभार हा आता सर्वसामान्य जनतेच्या मनाप्रमाणे सुरू झाला असल्याची भावना समाजाची बनली असून जनतेची कामे जलदगतीने मार्गी लावली पाहिजे”-कोते कमलाकर,जिल्हाध्यक्ष,बाळासाहेब शिवसेना उत्तर जिल्हा नगर.
शिर्डी येथे शासकीय विश्रामगृहात नुकतीच बाळासाहेबाची शिवसेनेची उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक खा सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,बाजीराव दराडे,जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुंडे,कावेरी नवले,युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ,महेश देशमुख,अध्यात्मिक अघाडीचे जिल्हाप्रमुख संपतराव जाधव,उपजिल्हाप्रमुख जयंतराव पवार,आण्णासाहेब म्हसे,भाऊसाहेब गगावणे,एकनाथ यादव,राजेश ताबे,ज्ञानेश्वर गुलदगड,मनील नरोडे,तालुकाप्रमुख रमेश काळे,देवेंद्र लांबे,राजेश सोनवणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शाम गोसावी,पूनम जाधव,मिराताई गुजाळ,वैशाली टरेताई यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात राज्य सरकारचा कारभार हा आता सर्वसामान्य जनतेच्या मनाप्रमाणे सुरू झाला असल्याची भावना समाजाची बनली आहे.त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे सर्वसामान्यांना आपला मुख्यमंत्री वाटतात असा दावा त्यांनी शेवटी केला आहे.व त्यांच्या येत्या ०९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वाढदिवसा साठी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करावे असे वाहन त्यांनी शेवटी केले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी,”पक्ष बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसापासून गावोगावी शाखेचे फलक लावले पाहिजेत,तसेच जास्तीत जास्त नवीन सभासद नोंदणी करून पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे व वाढदिवसानिमित्त गावोगावी आरोग्य शिबीर घेण्यात यावे असे आवाहन शेवटी केले आहे.