विविध पक्ष आणि संघटना
मुख्यमंत्र्यांकडे बाळासाहेबांच्या सेनेनें शिर्डीत केल्या विविध मागण्या
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आले असताना शिवसेना नगर जिल्ह्याच्या वतीने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिर्डी लोकसभा जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी शिर्डी व परिसरातील विविध समस्या सोडविण्याबाबद मागणी केली असून त्यांनी याबाबत आश्वसीत केले असल्याची माहिती कोते यांनी दिली आहे.
“मौजे शिंगवे येथील शेती महामंडळाची पडीक ३०० एकर जमीन साईबाबा संस्थानला देऊन त्या ठिकाणी शेगावचे धर्तीवर साई उद्यान उभारण्यात यावे,श्री साईबाबा संस्थान मधील कंत्राटी कर्मचारी यांना संस्थान सेवेत कायम करावे,शिरडी विमानतळवर नाईट लँडिंग सुरु करावे,श्री साईबाबा मंदिरातील दर्शन व्यवस्था पूर्ववत करावी आदी मागण्या मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे केल्या आहेत”-कमलाकर कोते,जिल्हाध्यक्ष,बाळासाहेबांची शिवसेना,नगर जिल्हा.
सदर मागण्यात त्यांनी सावळीविहिर-ते बहादरपूर या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या रस्त्याचे काम करून मिळावे यासह गोदावरी कालवे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा,मौजे शिंगवे येथील शेती महामंडळाची पडीक ३०० एकर जमीन साईबाबा संस्थानला देऊन त्या ठिकाणी शेगावचे धर्तीवर साई उद्यान उभारण्यात यावे,श्री साईबाबा संस्थान मधील कंत्राटी कर्मचारी यांना संस्थान सेवेत कायम करावे,शिरडी विमानतळवर नाईट लँडिंग सुरु करावे,श्री साईबाबा मंदिरातील दर्शन व्यवस्था पुर्वरत करावी श्री साईभक्तांना चागली व सन्मानजनक व्यवस्था मिळावी आदी मागण्यासंदर्भात निवेदन देऊन त्यावर करून चर्चा केली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी कमलाकर कोते यांनी मुख्यमंत्री यांचा सत्कार केला आहे.याप्रसंगी नेवासा येथील जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार,संपर्क प्रमुख सचिन जाधव,जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर,जिल्हाप्रमुख (दक्षिण) बाबुशेठ टायरवाले,युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ,जिल्हासंघटक विजय काळे,उपजिल्हाप्रमुख शिवाजी चौधरी,राहता तालुका प्रमुख नाना बावके,कोपरगाव तालुका प्रमुख थोरात,संगमनेर तालुका प्रमुख रमेश काळे,नेवासा तालुका प्रमुख सुरेश डी.के.,श्रीरामपूर तालुका प्रमुख बापू शेरकर, नेवासा शहरप्रमुख बाबासाहेब कांगने,श्रीरामपूर शहरप्रमुख सुधीर वायखींडे,संगमनेर शहरप्रमुख दिनेश फटांगरे,राजेंद्र शेळके,राहुल गोंदकर सुनील बारहाते आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.