विविध पक्ष आणि संघटना
…या भाजपच्या कार्यकर्त्यांचा कोपरगाव राष्ट्रवादीत प्रवेश !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पक्षीय कार्यकर्ते पाठविण्याच्या लढाईला वेग आला असून बक्तरपूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या दिवशीच रोजी दिवाळीचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून दिवाळीचे निवडणूकपूर्व फटाके फोडून वादाला प्रारंभ केला आहे.
राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपरिषद,महापालिका,बाजार समिती,बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.या पार्श्वभूमीवर राज्यात उलथापालथ सुरु झाल्या आहेत.त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातील पारंपरिक शत्रू (आपल्या सोयीचे) असलेले काळे आणि कोल्हे हे सावध झाले आहेत.व आपल्या पारड्यात कार्यकर्त्याना खेचून घेण्याच्या कामाला लागले आहे अशीच घटना बक्तरपूर येथे घडली आहे.
राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपरिषद,महापालिका,बाजार समिती,बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.या पार्श्वभूमीवर राज्यात उलथापालथ सुरु झाल्या आहेत.त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातील पारंपरिक शत्रू (आपल्या सोयीचे) असलेले काळे आणि कोल्हे हे सावध झाले आहेत.व आपल्या पारड्यात कार्यकर्त्याना खेचून घेण्याच्या कामाला लागले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील बक्तरपुर येथील गावात घडली आहे.यातील अनेक कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा दावा आ.आशुतोष काळे गटाने केला आहे.
यामध्ये राजेंद्र बंडू सानप,विजय चिंधू सानप,सुरेश माधव नागरे,गणेश वाळीबा नागरे,प्रवीण प्रभाकर गंभिरे या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा दावा केला आहे.या कार्यकर्त्यांचे आ.काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक डॉ.मच्छिंद्र बर्डे,श्रीराम राजेभोसले,सुधाकर रोहोम,गौतम बँकेचे संचालक खंडेराव सोनवणे,तसेच सोमनाथ सानप,गणेश सानप,शरद गरुड,अरुण डोंगरे,विलास सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील काही महिन्यांपासून कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रवेश सुरु झाल्याच्या दावा केला आहे.आ.काळे यांचे नेतृत्व मान्य करून भविष्यात देखील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे.