विविध पक्ष आणि संघटना
कोपरगावात राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांची निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नुकतीच कोपरगाव काँग्रेस सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील भगत यांची तर किसान सेल तालुकाध्यक्ष विजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आगामी कालखंडात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक येऊन ठेपली आहे.या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपल्या मतांच्या बेगमीस लागले आहे.त्याला काँग्रेसही अपवाद नाही.काँग्रेसने संघटन बांधणीस सुरुवात केली आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.
आगामी कालखंडात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक येऊन ठेपली आहे.या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपल्या मतांच्या बेगमीस लागले आहे.त्याला काँग्रेसही अपवाद नाही.काँग्रेसने संघटन बांधणीस सुरुवात केली आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही. त्यांनी संघटन वाढविण्यासाठी सुरुवात केली असून पदाधिकारी निवडी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी जाहीर केल्या आहेत.
कोपरगांव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भरत बाबुराव कराळे,विश्वनाथ पवार,पंढरीनाथ रामभाऊ खिलारी,उतमराव येडु त्रीभुवन,गंगाधर किसन राउत,विलास रामभाउ गव्हाळे,बाजीराव रामनाथ सोनवणे आदींना उक्कडगांव येथे पदे वितारीत केली आहेत.
त्यात ज्ञानेश्वर पाटील भगत-तालुकाध्यक्ष राष्ट्र सेवा दल, किसान सेल तालुकाध्यक्ष विजयराव जाधव व रमेशराव गागरे, राहाता तालुकाध्यक्ष राष्ट्र सेवा दल यांचा उपस्थितीत विविध पद नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.आगामी काळात तरुणांचे संघटन वाढवून आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुका लढवल्या जाणार आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,अ,नगर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.