विविध पक्ष आणि संघटना
शिर्डी शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी..यांची निवड
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
काँग्रेसची जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून त्या पाठोपाठ शिर्डी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा नुकतीच जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली असून त्या पदावर युवक नेते अमृत भाऊसाहेब गायके यांची वर्णी लावली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्यात काँग्रेसने पुन्हा उभारी घेण्यासाठी आपली कंबर कसली असून राज्याचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थॊरात यांच्या नेतृत्वाखाली नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.नगर जिल्हाही त्याला अपवाद नाही.जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा शहरे व तालुक्याच्या पदाधिकऱ्यांकडे वळवला आहे.व संघटना वाढविण्याकडे लक्ष केंदित केले आहे.त्यातूनच युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी शिर्डी शहर युवा काँग्रेसची घोषणा केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,देशभरात काँग्रेस पक्षावर सध्या मरगळ आलेली दिसत आहे.त्यावरून देशभर प्रसिद्धि माध्यमांवर चर्चा सुरु आहे.हा पक्ष इतका पिछाडीवर का गेला याचे चर्वितचर्वण सुरु आहे.मात्र राज्यात राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांनी मात्र महाआघाडी स्थापन करून सत्ता खेचून आणली आहे.त्यामुळे भाजपचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.आता राज्यात काँग्रेसने पुन्हा उभारी घेण्यासाठी आपली कंबर कसली असून राज्याचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थॊरात यांच्या नेतृत्वाखाली नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.नगर जिल्हाही त्याला अपवाद नाही.जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा शहरे व तालुक्याच्या पदाधिकऱ्यांकडे वळवला आहे.व संघटना वाढविण्याकडे लक्ष केंदित केले आहे.त्यातूनच युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी शिर्डी शहर युवा काँग्रेसची घोषणा केली आहे.त्यात अध्यक्ष पदी युवा काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते अमृत भाऊसाहेब गायके यांची निवड केली आहे.त्यांच्या निवडीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात.युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,आ. डॉ.तांबे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.एकनाथ गोंदकर,युवकांचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे,तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे,युवकांचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत मापारी,जेष्ठ नेते अर्जुनराव जगताप,गणेश गायके आदींनी अभिनंदन केले आहे.त्यांचा नुकताच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.एकनाथ गोंदकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.