विविध पक्ष आणि संघटना
भाजपात दुही,आरोप प्रत्यारोप सुरु,कोपरगावात आगामी निवडणूक ठरणार लक्षवेधी !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांची भाजपच्या उत्तर अ.नगर जिल्हा उपाध्यक्षपदी नेमणूक झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत असले तरी निष्ठावान भाजप नेत्यांना या निवडणुकीत सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याने कोपरगाव नगरपरिषेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी संताप व्यक्त केला आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मधील दुही उघड झाली आहे.त्याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
उत्तर अ.नगर जिल्हा भाजपचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी नुकतीच कोपरगाव तालुका भाजपच्या तालुका अध्यक्षपदी नुकतीच दुष्काळी भागातील बहादरपूर येथील माजी सरपंच कैलास रहाणे यांची तर तर जिल्हा उपायध्यक्ष विजय वहाडणे गटाचे विनायक गायकवाड यांची तर कोल्हे गटाचे विनोद राक्षे यांची निवड जाहीर केली आहे.यावर वादळ उठले असून या निवडीत माजी नगराध्यक्ष वहाडणे गटास माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी विरोध केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे भाजपचे निष्ठावान व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे गटाचे विनायक गायकवाड यांची निवड झाल्याने त्यावर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी विरोध केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे वहाडणे यांनी या प्रकरणी थेट सामाजिक संकेतस्थळावर निषेध व्यक्त केला आहे.त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यात सन-२०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या देशात झालेल्या आगमनामुळे व अवतरलेल्या मोदी युगामुळे राष्ट्रवादीतून कोल्हे गटाने भाजपचे दार ठोठावले होते.त्यांनी त्यानंतर आयुष्यात कायम जाहीरपणे भाजप हा,’जातीवादी पक्ष’ म्हणून हिणवलेल्या भाजपात उडी घेतली होती.त्या काळात हि चर्चा मोठी रंजक व टीकेला पात्र ठरली होती.मात्र सत्तेची चव चाखलेल्या नेत्याना त्याचे काहीही सोयर सुतक नसते याची अनूभूती त्या वेळी कोपरगाव तालुक्याला आली होती.त्यानंतर भाजप च्या निष्ठावान गटाशी निदान निवडणुकीपर्यंत तरी ते मिळून घेतील अशी निर्माण झाली होती.मात्र ती आगामी काळात फोल ठरली होती.त्यामुळे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडणूक जाहीर झाल्यावर विजय वहाडणे यांनी सन-२०१६ च्या अखेरीस त्यात उडी घेऊन कोल्हे गटास विक्रमी मतांनी धूळ चारली होती.
त्यानंतर या दोन्ही गटास एकत्र येण्याऐवजी त्यांच्यात वेळो वेळी दुरी वाढत गेली ती विधानसभा निवडणुकीत कायम दिसून आली होती.त्यात वहाडणे यांनी स्वतंत्र आपला अर्ज भरून पुन्हा एकदा दोन वर्षात कोल्हे गटास पाणी पाजून आपली दिशा स्पष्ट केली होती.त्या नंतर किंमत मोजल्यावर तरी कोल्हे गट आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्या स्वभावात बदल करील अशी अशा निर्माण झाली होती.ती आताच्या निवडीने पुन्हा एकदा फोल ठरली आहे.त्यामुळे आगामी लोकसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती,विधानसभा निवडणुकीत हा ‘अकाली शिमगा’ पुन्हा एकदा तालुका आणि शहरास अनुभवण्यास मिळणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडली असून त्यांनी बोलताना म्हटले आहे की,”आपण उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचेकडे कोपरगाव भाजप शहराध्यक्षपदी विनायक गायकवाड यांची तर तालुकाध्यक्षपदी सुभाष दवंगे यांच्या नेमणुकीची मागणी केली होती.मात्र या प्रकरणी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या या दोन्ही नावांना जिल्हा पातळीवर विरोध केला असून जिल्हा नेतृत्वासमोर राजीनामा देण्याची भाषा केली असल्याचे सांगितले आहे.याचा आम्हाला धक्का बसला असून माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे शेपूट विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजूनही वाकडे असल्याचे उघड झाले असल्याचा दावा केला आहे.व ज्यांनी अद्याप आपला पक्ष निश्चित नाही त्यांनी या निष्ठावान नावाना विरोध करावा हे आश्चर्यकारक असल्याचे जाहीर केले आहे.
कोपरगाव तालुका भाजप ‘ज्या’ मोजक्या निष्ठावान कार्यकर्त्यानी उभा केला आहे.त्यांना मागावून आलेल्या उपऱ्यांनी विरोध करावा हे खेदजनक असून आपल्या कार्यकर्त्याना न्याय मिळाला नाही हे शल्य आपल्याला नक्कीच राहणार असल्याचे बजावले आहे.ज्यांनी या नावांना विरोध केला आहे.माजी आ.कोल्हे यांनी किमान आपल्या आहे त्या पक्षात इमाने इतबारे रहावे असे आवाहन करून त्यांनी भाजप म्हणजे स्वतःची जहागिरी समजू नये.त्यांनी सत्तेचे राजकारण जरूर करावे मात्र निष्ठावानांना डावलून तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेत असल्याचे निदर्शनास आणले आहे.