जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

शिवसेना सोडल्यावर कोणीही विचारणार नाही-…या पदाधिकाऱ्याचा सल्ला

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


ज्या बबनराव घोलप यांना शिवसेनेने व शिवसैनिकांनी मंत्रीपद महापौरपद,आमदारकी दिली असताना देखील ते शिवसेना सोडण्याची भाषा करत आहे हि अजब घटना असून शिवसेना अडचणीत असताना मला डावलेल्या जात असल्याचा आरोप थेट मातोश्रीवर करत असल्याने शिवसैनिकांमध्ये मोठ्या असंतोष असून असे संपर्कप्रमुख आम्हाला नको,शिवसेना सोडल्यावर घोलपांना कोणीही विचारणार नाही अशी टिका शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख यांनी केले आहे.

“माजी मंत्री घोलप यांना,’टेबल पार्टनर’ कोण तर; ज्यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता ते.त्यांना ते निष्ठावान वाटत असून; आमच्यासारखे तळागाळातील शिवसैनिक त्याला गद्दार वाटू लागले आहे.हे आक्रीत घडत असून त्यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.पक्षाने घोलप यांची खासदारकीची उमेदवारी कापली यामुळे शिवसेनेसह उत्तर नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे”-इरफान शेख,जिल्हा प्रमुख,जिल्हा वहातूक सेना.

यावेळी बोलताना इरफान शेख म्हणाले की,”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांवर टिका करण्याची घोलप याची पात्रता नाही.पक्षप्रमुखांचा आदेश आपणास मान्य नसेल तर आपण चालते झाला तर तरीही काही अडचण होणार नाही.ठाकरे कुटुंब व मातोश्री हे आमचे श्रद्धास्थान असून मातोश्रीशी गद्दारी शिवसैनिक कदापि सहन करणार नाही.मातोश्रीवर काम करणारे सर्व नेते हे सर्व शिवसैनिक असून आम्हाला त्यांचा आदर आहे मात्र घोलप यांच्या अवती-भवती सर्व बडवे निर्माण झाले असल्याची टीका करून घोलप यांनी ते ओळखावे असे वाहन त्यांनी केले आहे.


व पुढे बोलताना म्हणाले की,”आम्हाला देखील अनेक वेळा पदावरून पायउतार व्हावे लागले आहे मात्र आम्ही कधीही शिवसेना किंवा मातोश्रीशी गद्दारी केली नाही.आम्ही आमचे काम ठाकरे या नावापुढे नेहमीच करत राहिलो मात्र ज्या घोलपांना तीस पस्तीस वर्ष आमदारकी,मंत्रीपद महापौरपद,उपनेते पद एवढे सर्व काही सेनेने भरभरून दिले असताना देखील तेच माजी मंत्री घोलप मातोश्री अडचणीत असताना त्यांना संपर्कप्रमुख पदावरून हटवल्याने मातोश्रीवर नाराज होऊन उपनेतेपदाचा राजीनामा देतात व  मातोश्री व उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न करत आहेत या घटनेला शिवसैनिक कदापिही माफ करणार नाही.
आमच्या सारख्या पन्नास वर्षापासून निष्ठावंत असलेल्या शिवसैनिकांना डावलून अशोक काळे यांचा पी.ए.असलेला व ज्याने शिवसेना संपविण्याची शपथ घेतलेला असा त्यांचा टेबल पार्टनर असलेल्याला त्याने जिल्हाप्रमुख केले.जे घोलप आम्हाला,” शिवसेना सोडल्यावर कुत्रेही विचारत नाही” असे म्हणायचे त्याच घोलप यांना आमचा सांगावा आहे की,” तूम्ही शिवसेना सोडली तरीही आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही;शिवसेनेने तुमच्यासारखे अनेक नेते उभे केले आहेत व अनेकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी शिवसेना सोडली.तूम्ही गेल्यानंतर तुम्हाला कुत्रं विचारणार नाही”अशी टीका केली आहे.
घोलप यांना,’टेबल पार्टनर’ ज्यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता ते घोलपला निष्ठावान वाटतात व आमच्यासारखे तळागाळातील शिवसैनिक त्याला गद्दार वाटू लागले आहेत त्यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.पक्षाने घोलप यांची खासदारकीची उमेदवारी कापली यामुळे शिवसेनेसह उत्तर नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.स्वतःच्या मुलीला भाजपात पाठवून आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना कोणत्या निष्ठेचे धडे घोलप देत आहेत स्वतःच्या घरात आधी सर्वांना सांभाळा व आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या शिवसेनेला व शिवसैनिकांना बदनाम करण्याचे कटकारस्थान घोलप यांनी थांबवावे.आपणास लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी दिलेले असताना देखील आपण आपली प्रतिमा स्वतःच्या कटकारस्थानामुळे व बगलबच्यांमुळे मलीन करून घेतली यामुळेच निवडून यायची क्षमता असलेला उमेदवार मातोश्रीला निवडावा लागला.यात पक्षप्रमुख व शिवसेना नेत्यांची कोणती चूक नाही.आपण आपल्या कर्माने पद गमावले आहे.दैव देते आणि कर्म नेते हा निसर्गाचा न्याय आहे.ठाकरे यांनी त्यांना मंत्रीपद दिले असताना देखील आपण या कार्यकाळात काय दिवे लावले हे सर्व महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे.याची थोडीफार तरी घोलप यांनी जाणीव ठेवावी असेही शेवटी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close