जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

शेतकरी संघटना आता बी.आर.एस.बरोबर जाणार-अड्.काळे

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपले लक्ष केंद्रित केले असून शेतकऱ्यांचे सरकार स्थापन करण्याचा विचार करून कृषी क्षेत्रातील प्रभावी नेते व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांना आपल्या बाजूने वळविण्यात यश प्राप्त केलं असून आगामी काळात दि.०९ ऑगष्ट रोजी ते इस्लामपूर येथे त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यातील नेत्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे.तर शेतकऱ्यांचे चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

“तेलंगणातील शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा,शेतीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पाच हजार एकरांचे क्‍लस्टर केले.इतक्‍याच क्षेत्रासाठी स्वतंत्र कार्यालय दिले.या कार्यालयात अधिकाऱ्यांसह वेळप्रसंगी आमदार,खासदार जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवितात.या मॉडेलचा आधार घेत देशाच्या राजकारणात पक्षाची बांधणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.त्याचा लाभ महाराष्टात शेतकऱ्यांना नक्कीच होईल”-अड्.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.

तेलंगण राज्याच्या निर्मितीचे शिल्पकार के.चंद्रशेखर राव यांनी राज्याचा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करतानाच कृषी विकासाच्या अनेक योजना राबवून त्यांनी शेतकऱ्यांचा त्राता अशी प्रतिमा निर्माण केली आहे.त्या आधारे तेलंगणा राष्ट्र विकास आघाडी हे पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र विकास आघाडी (बी.आर.एस.) असे नामकरण करून देशभर प्रभाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने तेलंगणाच्या उत्तरेस असलेल्या महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिले आहे.

मराठवाडा,पूर्व विदर्भ येथील दौरे केल्यानंतर आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे.आषाढी निमित्त जून महिन्यात त्यांनी पंढरपूर,सोलापूरची राजकीय वारी करीत राव यांनी या भागात पाय रोवण्याचे प्रयत्न केले आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसचे माजी खा.धर्मण्णा सादूल हे त्यांच्या सोबत राहिले.आता चंद्रशेखर राव यांनी कोल्हापूर- सांगली जिल्ह्यावर नजर रोखली आहे.त्यांच्या वाहनांचा भलामोठा ताफा दिमतीला घेऊन त्यांनी दोन जिल्ह्यात त्यांनी शक्तिप्रदर्शन करून शेतकरी सरकारची श्रीमंती पदोपदी दाखवून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान पुढे माहिती देताना अड्.काळे म्हणाले की,”या निमित्ताने सिफाचे राष्ट्रीय रघुनाथ दादा पाटील यांनी या दौऱ्याचे निमित्त साधून आपण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करीत असल्याचे घोषणा केली आहे.नवा राजकीय घरोबा केल्यानंतर पाटील यांनी ‘ देश व राज्य पातळीवरील भाजपचे सरकार लुटारूंचे असून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला आहे.के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये शेतकरी विकासासाठी आमुलाग्र कार्य केले आहे.तेलंगणातील धोरणामुळे आमची आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हि भूमिका प्रत्यक्षात उतरू शकेल.यासाठी या पक्षात प्रवेश केला आहे. दि.०९ ऑगष्ट रोजीच्या क्रांती दिनी भव्य शेतकरी मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट केली जाणार आहे,’अशा शब्दांत युक्तिवाद केला आहे.तर चंद्रशेखर राव यांनी रघुनाथदादा पाटील हे राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी प्रश्नासाठी लढणारे लढाऊ नेतृत्व आहे.ते पक्षात आल्याने ताकद वाढली आहे,असे म्हणत त्यांना ताकद पुरवायला सुरुवात केली आहे.

रघुनाथ पाटील हे १६ राज्यातील कार्यरत शेतकरी संघटना ‘शिफा’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.शरद जोशी यांचे विचार शिरोधार्य मानून ही संघटना कार्यरत आहे.संघटनेच्या सदस्य संघटनांना बीआरएस सोबत आणण्याचे पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.तसे झाल्यास चंद्रशेखरराव यांच्या मागे बळीराजाची मोठी ताकद उभी राहू शकते.

तेलंगणात बी.आर.एस.ने शेतकऱ्यांसह विविध समाजातील इतर घटकांच्या उत्कर्षासाठी तेलंगणामध्ये तब्बल ४१० योजना राबविल्या जात आहेत.या अंतर्गंत ८५ हजार शेतकरी कुटूंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले आहेत.सातबाराधारक व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यास दहा दिवसांत त्याच्या खात्यात ही रक्‍कम टाकली जाते.शेतकऱ्यास एकरी दहा हजारांची मदत दिली जात आहेत.राव यांनी तलाठी व्यवस्थाच संपुष्टात आणली आहे.त्यासाठी १२ हजार ७०० तलाठी दुसऱ्या खात्यात वळते केले.शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा,शेतीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पाच हजार एकरांचे क्‍लस्टर केले.इतक्‍याच क्षेत्रासाठी स्वतंत्र कार्यालय दिले.या कार्यालयात अधिकाऱ्यांसह वेळप्रसंगी आमदार,खासदार जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवितात.या मॉडेलचा आधार घेत देशाच्या राजकारणात पक्षाची बांधणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.त्याचा लाभ महाराष्टात शेतकऱ्यांना नक्कीच होईल असा दावा केला आहे.

दरम्यान शेतकरी संघटना बी.आर.एस.सोबत युती करून राज्यातील शेतकऱ्यांचा आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करणे,एम.एस.पी.प्रमाणे दर,साखर कारखान्याचे हवाई अंतर कमी करण्याचे वचन,शेती मालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे उत्पादन खर्चावर दर,दुष्काळी भागात धरणे बांधून सिंचन व्यवस्था करणे,शेती माल विना अट निर्यातक्षम बनवणे व निर्यातीवरील बंदी हटवणे,विनाकारण शेतमाल आयात थांबविणे आदी बाबत काम करणार आहे व बी.आर.एस.ने शब्द दिला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close